कोपरगाव । झुंजार न्यूज
निवडणुकीपुरतं असलेले भाजपचे कमळाचे फुल म्हणजे जनतेला एप्रिल फुल करणारे आहे. काँग्रेसचा पंजा केवळ निवडणुकीपुरता दिसतो, त्यानंतर जनतेला टाटा बायबाय करतात. सध्या टाईम काहीही असला तरी घड्याळाची वेळ वाईट चालू आहे. तुतारी वाजते की नाही, मशाल जळते की नाही कळत नाही, फक्त ठेवा आहे. पण कुकरमुळे प्रेमाने आपली दाळ भात तरी शिजते, असे म्हणत सुजात आंबेडकर यांनी विरोधकांचा समाचार घेतला व आपल्या सर्वांगीण विकासाकरिता उत्कर्षाताई रुपवतेंनाचं मतदान करा असे आवाहन केले
कोपरगाव येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदानावर शिर्डी लोकसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार उत्कर्षा रुपवते विजय संकल्प सभेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पंतू सुजात आंबेडकर होते. यावेळी वंचितच्या उत्कर्षा रूपवते, उपाध्यक्ष शेख, जिल्हाध्यक्ष कोळगे, शरद खरात, सुरेश शेळके, उत्तर महाराष्ट्र वामन गायकवाड, तालुकाध्यक्ष अनिल बनसोडे आदी होते.
उत्कर्षा रुपवते समतेची, स्वाभिमानाची व सन्मानाची आहे. आजपर्यंत दलित आदिवासी समाजाला वंचित ठेवण्याचे काम राजकीय प्रस्थापितांनी केले. यापूर्वी स्वतंत्र मतदारसंघाची मागणी केली. त्याला महात्मा गांधींनी विरोध केला.
आंबेडकर म्हणाले की, वंचित बहुजन आघाडीला भाजपची बी टीम म्हणणारेच आज भाजपबरोबर आहेत. भाजपला खरी टक्कर देणारी वंचित बहुजन आघाडी आहे. आमची लढाई ही विचारांची, स्वतंत्र निवडणूक लढता येणार नाही, म्हणून तुषार गांधींनी विरोध केला. आता हक्काचे मतदान करु नये, म्हणून पुन्हा एखादा गांधी दलित आदिवासींना विरोध करण्यासाठी येईल. त्यामुळे घटनेने दिलेल्या मतदानाच्या अधिकारातून आपला हक्क दाखवायचा आहे. विरोधी डरपोक झाले म्हणून रूपवतेंवर दगड मारला. पण जनतेने मतदानातून त्यांना उत्तर द्यावे, असे म्हणत उत्कर्षा रुपवतेंना विजयी करण्याचा संकल्प करा आंबेडकर यांनी व्यक्त केला. रुपवते म्हणाल्या, विरोधी उमेदवारांचे प्रेशर वाढले आहे. वंचित बहुजन आघाडीच्या एका महिलेने प्रचारात आघाडी घेतल्याने त्यांच्या पायाखालची वाळू घसरली आहे. मला सर्वसामान्य जनतेतून मिळणारा सकारात्मक प्रतिसाद विरोधकांना पचनी पडत नसल्याने माझ्यावर दगडफेक केली. मात्र मी सावित्री, जिजाऊ, रमाईची लेक आहे. अशा दगडाला घाबरत नाही. माझ्यावर दगड मारणाऱ्यांच्या दगडामागे ज्यांचा हात आहे. पण हा दगड उत्कर्षा रुपवतेंवर मारला नसून समाजासाठी लढणाऱ्या संपूर्ण स्त्रियांवर मारला आहे. यावर खुद्द गृहमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसह जिल्ह्यातील एकाही नेत्याने निषेध व्यक्त करीत एक शब्द बोलू शकत नाहीत. इतर वेळी महिला सक्षमीकरण, सबलीकरण यावर छातीठोकपणे बोलणारे आता शांत का? असा सवाल त्यांनी केला.
दरम्यान, वंचित बहुजन आघाडीच्या सभेला नागरिकांची गर्दी होती, केवळ गर्दीच नाही तर उत्कर्षा रूपवते यांना विजयी करणारे दर्दी जनता एकवटली होती. उपस्थित अनेक सामान्य नागरिकांनी रुपवते यांना अर्थिक मदत करुन निवडणुकीत बळ देत असल्याचे दिसून आले.
Post Views: 714
