नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती

संगमनेर । झुंजार न्यूज

शिर्डी लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा शनिवारी (दि. ११) संध्याकाळी थंडावल्या असून वंचित आघाडीकडून उत्कर्षा रुपवते यांनी अकोले तालुक्यात प्रचारार्थ पदयात्रा काढून सायंकाळी समारोप सभा घेण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
रूपवते यांनी अकोले शहरांमध्ये त्यांच्या प्रचारार्थ पदयात्रेचा महात्मा फुले चौक, कोल्हार घोटी रस्ता, कचेरी रोड, शाहू नगर, ईदगाह मैदान, इंदिरा नगर, घोटी, कोल्हार रस्त्याने नगर पंचायत, सिनेमा थिएटर, गुजरी मार्केट, छत्रपती शिवाजी महाराज चौक, आणि खटपट नाका सोसायटी पटांगण असा पदयात्रेचा मार्ग होता. तर सोसायटीच्या पटांगणात रुपवते यांची समारोप सभा घेण्यात आली. यावेळी नागरिक उपस्थित होते.
समारोप सभेत रुपवते यांनी आजी माजी खासदार यांच्यावर टीकेची झोड उठवली. एकाने दहा वर्ष तर एकाने पाच वर्ष शिर्डी लोकसभेचे प्रतिनिधित्व केले. पण सर्वसामान्यांच्या कल्याणासाठी कुठलेही काम केले नाही. हायमॅक्स दिवे व सभा मंडप बांधून सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सुटत नाही. केवळ दहा वर्षात हवेत विकास केल्याची टीका केली. खरा विकास काय असतो ते मी खासदार झाल्यावर दाखवणार असल्याचे सांगितले.
राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed