संगमनेर । झुंजार न्यूज

 

कोकणगांव शिवापुर मधील बहुजनाचा उत्कषा रुपवतेना जाहिर पाठिंबा संगमनेर तालुक्यातील राजकीय दृष्टि अत्यंत महत्वाच समजल्या जाणाऱ्या कोकणगांव शिवापुर मधील बहुजन मतदारांनी येथील लुंबीनी बौध्द विहारात तातडीची बैठक आयोजित करण्यात आली होती त्या बैठकीमध्ये शिर्डी लोकसभेचे वंचित बहुजन आघाडीचे लोकप्रिय उमेदवार उत्कृषाताई रूपवते यांना जाहिर पाठिंबा देण्याचा ठराव पास करण्यात आला 

 

तसेच त्याच्या गाडीवर झालेल्या भ्याड हल्ल्याचा व साकुर येथील बॅनर फाडण्याचा जाहिर निषेध करण्यात आला प्रस्थापित आतापर्यंत जाणुन बुजुन बौध्द बांधवांची लोकसंख्या जास्त असुन सुध्दा उमेदवारी जाणुन बुजुन दिली नाही वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकरांनी यावेळी बौध्द समाजाच्या उत्कषा ताई रूपवते यांना उमेदवारी देऊन बौध्द समाजाला संधी उपलब्ध करून दिल्याने संपूर्ण शिर्डी मतदारसंघात व बौध्द समाजामध्ये आनंदाचे वातावरण झाले असून बौध्द समाजासह मराठा ओबीसी आदिवासी मुस्लिम समाज पुर्ण ताकदीने उत्कृषाताई रुपवते याच्या पाठीमागे खंबीर पणे उभा राहीला आहे

 

यावेळेस लोकसभेला उत्कृषाताई ला जे मदत करणार त्याच्याच पाठीमागे येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती स्थानिक पातळीवरील निवडणूका व विशेष करून विधानसभेसाठी त्याच्याच विचार केला जाणार त्यानाच मतदान करायचे असा ठराव बहुमताने पास करण्यात आला शिर्डी मतदारसंघातील प्रत्येक गावागावात याच पद्धतीने नियोजन झालेले असुन प्रस्थापितांना येणाऱ्या काळात ही मोठी धोक्याची घंटा असे मानले जात आहे

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed