नगर जिल्ह्यातील दोन्ही जागा महाविकास आघाडीचे उमेदवार जिंकतील
देशात इंडिया आघाडीचे सरकार येणार
संगमनेर । झुंजार न्यूज
देशामध्ये भाजपा विरोधात मोठी लाट निर्माण झाली आहे. पंतप्रधान हे केलेल्या कामांच्या मुद्द्यावर बोलत नसून धार्मिकतेचे राजकारण करत आहेत. महाराष्ट्रातील पक्ष फोडाफोडी जनतेला मान्य नाही. चार जून नंतर देशात इंडियाचे सरकार सत्तेवर येणार असून यामध्ये अहमदनगरचे दोन्ही खासदार असतील असे सांगताना शिर्डी लोकसभा मतदारसंघातून भाऊसाहेब वाकचौरे यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करा असे आवाहन काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.

घुलेवाडी, गुंजाळवाडी येथे महाविकास आघाडीचे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या प्रचारार्थ आयोजित बैठकांमध्ये ते बोलत होते यावेळी समवेत भाऊसाहेब वाकचौरे, रणजितसिंह देशमुख, कॅन्सर तज्ञ डॉ. जयश्रीताई थोरात, शिवसेनेचे सुहास वहाडणे, संजय फड, नवनाथ आरगडे, सिताराम राऊत, अभिजीत ढोले, सरपंच सौ निर्मला राऊत आदींसह महाविकास आघाडीचे विविध पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी बोलताना आमदार थोरात म्हणाले की, पंतप्रधान मोदी हे दोन दिवसातून महाराष्ट्रात येत आहेत. चारशे पार ची घोषणा देणारे पंतप्रधान आता ज्येष्ठ नेते शरदचंद्रजी पवार व उद्धव ठाकरे यांना साद घालत आहे .याचा अर्थ त्यांनी हार स्वीकारली आहे.

महाराष्ट्रात झालेली पक्ष फोडाफोडी, देशात वाढलेली महागाई ,बेरोजगारी हा अत्यंत चिंतेचा विषय असून पंतप्रधानांनी झालेली कामे आणि करावयाची कामे यावर बोलायला हवे. मात्र पंतप्रधान धार्मिकतेचे राजकारण करत आहेत. पंतप्रधान पदाला न शोभणारी त्यांची वक्तव्य असून राज्यामध्ये महाविकास आघाडीला 40 च्या पुढे जागा मिळतील तर देशामध्ये इंडिया आघाडीचे सरकार येईल.

खरे तर अजित पवार यांना लढण्याची मोठी संधी होती. मात्र ज्या ठिकाणी त्यांनी लढायचे त्या ठिकाणी ते लढले नाही आणि लंके हे जनतेचे उमेदवार आहेत त्यांना जनतेने निवडले आहे. त्यांच्याविरुद्ध अशी दादागिरीची भाषा करणे योग्य वाटत नाही.सर्वत्र महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीला चांगले वातावरण असून अहमदनगरचे दोन्ही खासदार ही महाविकास आघाडीचे असतील. शिर्डी मतदारसंघातून भाऊसाहेब वाकचौरे यांनी सातत्याने कायम चांगला संपर्क ठेवला आहे हक्काचा माणूस म्हणून त्यांची सर्वत्र ओळख आहे. या मोठ्या मतदारसंघातील प्रत्येक गावात त्यांचा संपर्क असल्याने त्यांचा विजय निश्चित आहे .संगमनेर तालुक्यातून व संपूर्ण शिर्डी मतदार संघातून सर्व नागरिक बंधू-भगिनींनी खासदार वाकचौरे यांच्या पाठीशी उभे राहून त्यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करावी असे आवाहन त्यांनी केले.

तर भाऊसाहेब वाकचौरे म्हणाले की, जिल्ह्यामध्ये आमदार बाळासाहेब थोरात ही सर्वात सुसंस्कृत आणि सर्वांना सोबत घेऊन जाणारे नेतृत्व आहे. या पुढील काळात आपण त्यांच्या मार्गदर्शनाखाली चांगले काम करणार असून मतदारसंघातील गावागावात विकासाच्या योजना राबवण्यासाठी कटिबद्ध राऊत असा विश्वास व्यक्त केला.

तर डॉ.जयश्रीताई थोरात म्हणाल्या की, भाजप सरकार विरोधी तरुणांमध्ये मोठी चिड निर्माण झाली आहे .दोन कोटी नोकऱ्यांची फसवे आश्वासना बरोबर वाढलेली महागाई, महाराष्ट्रातून गुजरात मध्ये पळवलेले उद्योग, फोडाफोडीचे राजकारण यामुळे यावेळेस भाजप सरकार तडीपार होणार आहे.
गावातून निघालेल्या प्रचार रॅलीस नागरिक महिला युवकांचा मोठा प्रतिसाद मिळाला.
