जाती जातींमध्ये भांडले लावणारे मोदी सरकारला हटवा
मोदींची खोटी गॅरंटी आता महाराष्ट्राला नकोय – सौ प्रभावती घोगरे
अंभोरे येथे प्रचाराची सांगता सभा
संगमनेर
भाजपाने इतर पक्षांचे लोक फोडले, महाविकास आघाडी समोर लढायला यांच्याकडे उमेदवार नाहीत.जाती जाती मध्ये भांडले लावून महाराष्ट्रातील उद्योग पळवणारी गुजरातची टोळी आहे. त्यांना साथ देणारे निष्क्रिय खासदार लोखंडे यांना घरी बसवा असे आव्हान राष्ट्रवादीच्या युवा नेत्या सक्षणा सलगर यांनी केले असून सातत्याने खोटे बोलणारे पंतप्रधान मोदींची गॅरंटी आता महाराष्ट्राला नकोय अशी घाणाघाती टीका सौ प्रभावती घोगरे यांनी केली आहे.

अंभोरे येथे महाविकास आघाडीच्या प्रचाराच्या सांगता प्रसंगी ते बोलत होते .यावेळी अध्यक्षस्थानी रणजीतसिंह देशमुख हे होते. तर व्यासपीठावर उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे, कॅन्सरतज्ञ डॉ जयश्रीताई थोरात, सौ प्रभावती ताई घोगरे, सक्षणा सलगर ,शंकर पा. खेमनर, मीराताई शेटे ,मिलिंद कानवडे, बाबा ओहोळ, अमर कतारी, संजय फड, किरण रोहम आदींसह महाविकास आघाडीचे पदाधिकारी होते.

यावेळी बोलताना सक्षणा सलगर म्हणाल्या की, भाजप हा पक्ष भ्रष्टाचार यांना घेऊन देशभर फिरतो आहे. सर्वात भ्रष्टाचारी असलेल्या या पक्षाने राष्ट्रवादी काँग्रेस फोडली. सुसंस्कृतपणाचे सल्ले देणारे अजित पवार अत्यंत अशोभनीय भाषा आज करत आहेत. जे स्वतःच्या चुलत्याचे झाले नाही. ते महाराष्ट्राचे काय होऊ शकतात अशी टीका करताना अजित पवार भ्रष्टाचारी आहे की नाही हे पहिले मोदींनी सांगावे असे त्या म्हणाल्या तर शिर्डीतील खासदार कधी कुणाला दिसले नाही. मुंबईचे पार्सल परत पाठवून द्या असे आवाहनही त्यांनी केले.

तर प्रतिभाताई घोगरे म्हणाल्या की, सुसंस्कृत महाराष्ट्राला यशवंतराव चव्हाण, मल्हारराव होळकर,शरद पवार यांची मोठी परंपरा आहे. मात्र सर्व लबाड आणि भ्रष्ट लोक भाजपमध्ये सामील झाले आहे .गुजरातची घोसखोरी रोखण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र आले पाहिजे. अनेक दिवस टीव्हीवर करमणूक करणारे सोमय्या कुठे गायब झाले माहित नाही. मोदी सातत्याने खोटी ग्यारंटी देत आहेत त्यांची खोटी ग्यारंटी नको आहे. याकरता सर्वांनी महाविकास आघाडीला मत द्या असे आवाहन केले.

तर डॉ.जयश्रीताई थोरात म्हणाल्या की, पंधरा लाख रुपये, दोन कोटी नोकऱ्या,भ्रष्टाचार मुक्त देश अशा विविध घोषणा देणाऱ्या मोदींनी सर्व भ्रष्टाचारी सामावून घेतले. अनेक निवडणुकीच्या जूमलेबाजी घोषणा केल्या. लोकांनी त्यांना ओळखले असून हे भ्रष्टाचारी सरकार हटवण्यासाठी महाराष्ट्राची मशाल दिल्लीत पाठवा असे आवाहन केले.
तर रणजीतसिंह देशमुख म्हणाले की, विद्यमान खासदार कधी कुणाला दिसले नाही.ते कुणाच्या गावात आले नाही.पाच वर्षात एक काम केले नाही.त्यामुळे आपल्याला हक्काचा माणूस वाकचौरे यांच्या रूपाने मिळणार आहे.
तर भाऊसाहेब वाकचौरे म्हणाले की, आ.बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली जास्तीत जास्त निधी संगमनेर तालुक्याला देण्याबरोबर शिर्डी मतदार संघ हा देशातील आदर्श बनवू असे ते म्हणाले.
यावेळी महाविकास आघाडीच्या विविध नेत्यांनी आपली मनोगत व्यक्त केली .जोरदार घोषणाबाजी व प्रचार रॅलीने दिमागदार पद्धतीने प्रचाराची सांगता झाली.
काँग्रेस नेते आमदार थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व कार्यकर्ते सक्रिय
काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्यावर राज्याची जबाबदारी असून संगमनेर तालुक्यातील ही प्रचाराचे नियोजन अत्यंत काटेकोर केले आहे. तालुक्यासह शिर्डी मतदारसंघातील प्रत्येक तालुक्यातील कार्यकर्ते महाविकास आघाडीच्या उमेदवारासाठी अत्यंत सक्षमपणे काम करत असून मोठे मताधिक्य देण्यासाठी काम करत असल्याचे रणजीत सिंह देशमुख म्हणाले.
