Skip to content
  • Fri. Sep 18th, 2026
Zunjhar News

Zunjhar News

"ताज्या बातम्या, सतत अपडेट्स - आपलं वेबसाईट, आपलं समाचार"

  • अंतरराष्ट्रीय
  • आरोग्य
  • खेळ
  • सामाजिक
  • राजकीय
  • सामाजिकशैक्षणिक
    • मनोरंजन
    • हवामान
    • राष्ट्रीय
  • कोपरगांव बेट कचेश्वर मंदिरात महाशिवरात्र उत्सवाची तयारी पूर्ण 
सामाजिक

राजस्थानी छन्याती ब्राह्मण जगदीश मंदिर ट्रस्टच्या अध्यक्षपदी राजेश आसोपा तर उपाध्यक्षपदी नितिन ओझा यांची निवड

Byराजेश गायकवाड

Apr 21, 2026 #राजस्थानी छन्याती ब्राह्मण जगदीश मंदिर ट्रस्टच्या अध्यक्षपदी राजेश आसोपा तर उपाध्यक्षपदी नितिन ओझा यांची निवड

मंदिर जीर्णोद्धारासाठी नवीन समितीची स्थापना

संगमनेर । झुंझार न्यूज

येथील राजस्थानी छन्याती ब्राह्मण समाजाचे आराध्य दैवत असलेल्या पुरातन जगदीश मंदिर ट्रस्टच्या कार्यकारी मंडळ आणि विश्वस्त मंडळाची महत्त्वपूर्ण बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत ट्रस्टच्या रिक्त असलेल्या अध्यक्षपदी श्री. राजेश जगदीशजी आसोपा यांची एकमताने निवड करण्यात आली आहे.

शनिवार, दिनांक १८ एप्रिल २०२६ रोजी आयोजित करण्यात आलेल्या या बैठकीत विश्वस्त मंडळातील विविध पदांवरील फेरबदल आणि मंदिराच्या प्रलंबित कामांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

ट्रस्टचे मार्गदर्शक स्वर्गीय सुरेश काका जोशी यांच्या निधनामुळे अध्यक्षपद रिक्त झाले होते. समाजाच्या सर्व सदस्यांच्या सहमतीने या पदाची जबाबदारी आता श्री. राजेश जगदीशजी आसोपा यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. तसेच, उपाध्यक्षपदी श्री. नितीन नंदलालजी ओझा यांचीही एकमताने निवड करण्यात आली.
मंदिर जीर्णोद्धारासाठी विशेष समिती

संगमनेर येथील हे जगदीश मंदिर अत्यंत पुरातन असून सध्या या मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम सुरू आहे. हे काम अधिक गतीने, पारदर्शक आणि नियोजनबद्ध पद्धतीने पूर्ण करण्याच्या उद्देशाने बैठकीत ‘जगदीश मंदिर निर्माण समिती’ची स्थापना करण्यात आली. या नवनियुक्त समितीच्या अध्यक्षपदी श्री. अभिजीत सुरेशचंद्रजी जोशी यांची निवड करण्यात आली आहे. मंदिराचा हा जीर्णोद्धार संकल्प वेळेत आणि भव्य स्वरूपात पूर्ण करण्याचा निर्धार यावेळी सर्व उपस्थितांनी व्यक्त केला.

या महत्त्वपूर्ण बैठकीला ट्रस्टचे खजिनदार श्री. ओंकार तिवारी, सचिव श्री. मनोज साकी यांच्यासह विश्वस्त मंडळाचे सदस्य श्री. सतीश खंडेलवाल, श्री. रवी जोशी, श्री. ओंकार जोशी, श्री. श्यामसुंदर जोशी, श्री. कैलास पंचारिया, श्री. नरेंद्र ओझा आणि श्रीमती राजेश्वरी ओझा उपस्थित होत्या.

राजेश आसोपा यांच्या निवडीबद्दल समाजाच्या विविध स्तरातून त्यांचे अभिनंदन करण्यात येत असून, त्यांच्या नेतृत्वाखाली मंदिराचे कार्य आणि सामाजिक उपक्रम अधिक प्रभावीपणे राबवले जातील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

राजेश गायकवाड

Post Views: 274

Post navigation

पानोडी येथे श्री साईबाबा मंदिर जीर्णोद्धार व मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे आयोजन
अकोल्यात ५०० कलावंतांचा एल्गार! कलावंतांवरील भ्याड हल्ल्यांचा निषेध; ११ प्रलंबित मागण्यांसाठी गुरुवारी तहसीलवर धडक

By राजेश गायकवाड

Related Post

सामाजिक

नागरिकांना आपत्कालीन वैद्यकीय मदतीसाठी तात्काळ प्राधान्य द्या – डॉ. जयश्रीताई थोरात

Sep 16, 2026 राजेश गायकवाड
सामाजिक

लोकशाहीचा निर्णय रस्त्यावर की सभागृहात?

Sep 16, 2026 राजेश गायकवाड
Uncategorized सामाजिक

संगमनेर शहरातील दिल्ली नाका परिसरात कंटेनरखाली चिरडून एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू !

Sep 15, 2026 राजेश गायकवाड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026
  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026
  • December 2025
  • November 2025
  • October 2025
  • September 2025
  • August 2025
  • July 2025
  • June 2025
  • May 2025
  • April 2025
  • March 2025
  • February 2025
  • January 2025
  • December 2024
  • November 2024
  • October 2024
  • September 2024
  • August 2024
  • July 2024
  • June 2024
  • May 2024
  • April 2024
  • March 2024
  • February 2024
  • January 2024
  • December 2023
  • November 2023
  • October 2023
  • September 2023
  • August 2023
  • July 2023
  • June 2023
  • May 2023
  • April 2023
  • March 2023
  • January 2023

Categories

  • Uncategorized
  • अंतरराष्ट्रीय
  • आरोग्य
  • खेळ
  • मनोरंजन
  • राजकीय
  • राष्ट्रीय
  • सामाजिक
  • सामाजिकशैक्षणिक
  • हवामान

Recent Posts

  • राजहंस हा गुणवत्तेचा व विश्वासाचा अस्सल ब्रँड – माजी मंत्री बाळासाहेब थोरात
  • गुरुवारी राजहंस दूध संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा
  • नागरिकांना आपत्कालीन वैद्यकीय मदतीसाठी तात्काळ प्राधान्य द्या – डॉ. जयश्रीताई थोरात
  • लोकशाहीचा निर्णय रस्त्यावर की सभागृहात?
  • संगमनेर शहरातील दिल्ली नाका परिसरात कंटेनरखाली चिरडून एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू !

Recent Comments

No comments to show.
Weather Widget INDIA WEATHER
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3

You missed

राजकीय

राजहंस हा गुणवत्तेचा व विश्वासाचा अस्सल ब्रँड – माजी मंत्री बाळासाहेब थोरात

September 17, 2026 राजेश गायकवाड
राजकीय

गुरुवारी राजहंस दूध संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा

September 16, 2026 राजेश गायकवाड
सामाजिक

नागरिकांना आपत्कालीन वैद्यकीय मदतीसाठी तात्काळ प्राधान्य द्या – डॉ. जयश्रीताई थोरात

September 16, 2026 राजेश गायकवाड
सामाजिक

लोकशाहीचा निर्णय रस्त्यावर की सभागृहात?

September 16, 2026 राजेश गायकवाड

Our Visitor

4 0 3 6 1 1
Total Users : 403611
Views Today : 28

  • Terms
  • Privacy Policy
  • Disclaimer
  • Contact us
  • About
Zunjhar News

Proudly powered by WordPress | Theme: Newsup by Themeansar.

  • Terms
  • Privacy Policy
  • Disclaimer
  • Contact us
  • About