{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":["local"],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":false,"containsFTESticker":false}

 

तीन दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल

आश्वी । झुंझार न्यूज

संगमनेर तालुक्यातील पानोडी येथील मुंढे वस्तीवर श्री साईबाबा मंदिराचा जीर्णोद्धार व भव्य मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा अत्यंत उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडणार आहे. येत्या २४ एप्रिल ते २६ एप्रिल २०२६ या कालावधीत हा मंगलमय सोहळा आयोजित करण्यात आला असून, यानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

कुलदैवत श्री खंडोबा महाराज आणि श्री रेणुका माता यांच्या आशीर्वादाने आयोजित या सोहळ्याची जय्यत तयारी सध्या मुंढे वस्ती परिसरात सुरू आहे.

सोहळ्याच्या पहिल्या दिवशी शुक्रवारी सकाळी ९ ते १२ या वेळेत श्री साईबाबांच्या मूर्तीची भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. यावेळी पारंपरिक वाद्यांच्या गजरात आणि ‘साईं’च्या जयघोषात संपूर्ण गाव दुमदुमून निघणार आहे.

दुसऱ्या दिवशी, शनिवारी सकाळी ९ ते ५ या वेळेत विधीवत मंत्रोच्चारात श्री साईबाबांच्या मूर्तीची मंदिरात प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. या धार्मिक विधीसाठी परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. .

सोहळ्याची सांगता रविवारी भव्य कीर्तनाने होईल. दुपारी ५ ते रात्री ९ या वेळेत प्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प. अक्रोड महाराज साखरे (बीडकर) यांचे जाहीर हरिकीर्तन संपन्न होईल. महाराजांच्या रसाळ वाणीतून होणाऱ्या या कीर्तनाचा लाभ घेण्यासाठी भाविकांनी उपस्थित राहावे, असे रंगन्नाथ अनुरथ मुंढे , पंढरीनाथ अनुरथ मुंढे , ज्ञानेश्वर गोरक्षनाथ मुंढे , महेश पंढरीनाथ मुंढे , साहिल रंगन्नाथ मुंढे , यांनी आवाहन केले आहे. कीर्तनानंतर भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *