संगमनेर । झुंजार न्यूज
शिर्डी लोकसभा मतदारसंघातील निवडणूक सर्वसामान्य मतदारांनी हातात घेतली आहे. मतदारसंघातील सामान्य मतदार हीच माझी शक्ती आहे. या मतदारांच्या विश्वासावरच आपण निवडणुकीला सामोरे जात आहोत, ही लढाई धनशक्ती विरुध्द जनशक्ती अशी आहे, अशी टीका शिर्डी लोकसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार उत्कर्षा रूपवते यांनी केली.
कॉंग्रेसने माझा गांभीर्याने विचार केला नाही
शिर्डी लोकसभा मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारी करताना गावो गावी लोकांमध्ये एक विश्वास निर्माण झाला त्यांना एक पर्याय उभा राहिल्याने आशेचे किरण दिसू लागले रुपवतेंच्या तीन पिढ्या काँग्रेससोबत राहिल्यानेचं शिर्डी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी आपण काँग्रेस पक्षाकडून इच्छुक होतो. मात्र काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी आपल्या उमेदवारीबाबत गांभीर्याने विचार केलाचं नाही. या मतदार संघात माझ्यासाठी शेवटची संधी होती. त्यामुळे आपण बहुजन वंचित आघाडीकडून निवडणूक लढविण्याचे पाऊल उचलले त्यातून लोकांचा ही पाठिंबा मिळत गेला
आमदार बाळासाहेब थोरात हे जेष्ठ नेते आहेत. माझ्यासाठी ते आदरणीय आहेत. काहीही झाले तरी मी अहमदनगर जिल्ह्याची मुलगी आहे. जिल्ह्यातील मी सगळ्या नेत्यांना भेटून माझी भूमिका मांडली आहे. त्यांना मला मदत करणे शक्य आहे, त्यामुळे मी माझी भूमिका मांडली आहे, असे उत्कर्षा रुपवते म्हणाल्या.
शिर्डीसाठी कॉंग्रेसचा रेटा कमी पडला
दोन्ही आजी-माजी खासदारांनी काय काम केले आहे, हे जनतेसमोर आहे. एक नवीन उमदा महिला चेहरा नक्कीच लोकांच्या पसंतीस उतरलेचे चित्र दिसल्याने एक विश्वास निर्माण झाला आहे. काँग्रेसमध्ये आमच्या तीन पिढ्या गेल्यात. महाविकास आघाडीच्या वाटाघाटीत नक्कीच काही चुका झाल्यात. महाविकास आघाडीत ही जागा काँग्रेसने आपल्या वाट्याला घ्यायला पाहिजे होती. पण कॉंग्रेसचा रेटा कमी पडला, असं मला वाटते.
रुपवते म्हणाल्या, महिलाच्या सबलीकरणासाठी आणि त्यांच्या उद्योजकतेला वाव देण्यासाठी मी काम करणार आहे. सोबतच युवक, शेतकरी, मतदारसंघातील अन्य प्रश्नांसाठी पुढील काळात काम करणार आहे. दोन्ही आजी-माजी खासदारांनी काय काम केले हे जनतेने पाहिले आहे. माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी माझ्यावर टीका करताना विचार करावा. स्वतः 10 वर्षे किती पक्ष फिरून आलेत .
निवडणुकीत चिन्हाबद्दल चिंता नाही. एक सक्षम पर्याय म्हणून लोक निश्चितच मागे उभे राहतील. माझ्या मागे कोणतीही अदृश्य शक्ती नाही. फक्त जनतेची ताकद सोबत आहे. त्याच पाठबळावर मला लढायचे आहे. दोन्ही निष्क्रिय आजी-माजी खासदारांचा इतिहास बघता माझ्या हितचिंतकांनी “ना आजी, ना माजी, उत्कर्षाताई मारणार बाजी” ही टॅग लाईन तयार केली होती . मी नवीन पक्षात प्रवेश केल्यानंतरचे लोकांचे प्रेम दिवसांदिवस वाढत गेले ही जनता जनार्दन नक्कीच मला मतदानातून साथ देणार, असा विश्वासही रुपवतेंनी व्यक्त केला.
