तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना

 

लोणी । झुंजार न्यूज

 

प्रवरा परिसरांतील दाढ बुद्रुक येथे शुक्रवारी दुपारी झालेल्या वादळी पावसांने परिसरांतील अनेक शेतक-यांच्या गोठ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या नुकसानग्रस्त भागाची महसूल मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी पाहणी करत शेतक-यांना शासनाच्या वतीने मदत करण्यासाठी नुकसानग्रस्त शेतक-याचे तातडीने पंचनामे करण्याच्या सुचना मंत्री विखे पाटील यांनी दिल्या.

 

 

दाढ बुद्रुक येथे शुक्रवारी दुपारी झालेल्या वादळामध्ये मच्छींद्र काशीनाथ तांबे यांची दुभती गाय व गोठ्यांचे मोठे नुकसान झाले. सुनील गाडेकर यांच्या घरावर झाड पडून घराचे मोठे नुकसान ,तसेच सुनिल दाभाडे यांच्या घरावर झाड पडून घरांचे मोठे नुकसान झाले तसेच गाईच्या गोठ्यासह चार गाई जखमी झाल्या. संतोष गाडेकर यांचे ही या वादळामध्ये मोठे नुकसान झाले आहे. वादळाचा वेग जास्त असल्याने दाढमध्ये अनेक शेतक-यांचे मोठे नुकसान झाले आहे .

 

 

मंत्री ना.विखे पाटील यांनी या भागातील नुकसानग्रस्त भागास भेट देऊन शासनाच्यावतीने शेतक-यांना दिलासा देऊन अधिका-यांनी सर्वाचे पंचनामे करण्याच्या सुचना दिल्या.यामध्ये ३८ जणांच पंचनामे करण्यात आले आहे. यावेळी विखे पाटील कारखान्याचे संचालक सुनिल तांबे,माजी संचालक प्रताप तांबे, अशोक गाडेकर,सरपंच तात्यासाहेब सातपुते,उपसरपंच नकुल तांबे,गोरक्षनाथ तांबे,योगेश तांबे सुनिल तांबे,भास्कर तांबे,गोकुळ गाडेकर, नायब तहसिलदार हेमंत पाटील.तलाठी विठ्ठल कानडे,मंडळ अधिकारी रमेश झेंडे,पशुवेद्यकीय अधिकारी डाॅ.सतीष शिरसाठ आदी उपस्थित होते.

 

 

जिल्हयातही अवकाळी पावसाने नूकसान झालेल्या परीस्थीतीची माहीती मंत्री विखे पाटील यांनी घेतली.

 

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed