कोपरगाव । झुंजार न्यूज

माजी मंत्री स्व.शंकरराव कोल्हे यांचे नातू व माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांचे सुपुत्र विवेक कोल्हे हे श्री गणेश कारखाना निवडणुकीत संपूर्ण महाराष्ट्राला परिचित झाले होते.दि.३१ मे रोजी राजकीय पक्षीय जोडे बाजूला ठेवत नाशिक शिक्षक मतदारसंघातून आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
नाशिक शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीचा अपक्ष उमेदवारी अर्ज आयुक्त कार्यालय नाशिक येथे निवडणूक निर्णय अधिकारी श्री. राधाकृष्ण गमे यांच्याकडे सुपूर्द करत दाखल केला.याप्रसंगी मराठा विद्याप्रसारक संस्थेच्या माजी सरचिटणीस श्रीमती निलीमाताई पवार,के के वाघ शिक्षणं संस्थेचे श्री. समीर वाघ,प्रा.श्री.साळुंके सर,श्री.राजेंद्र कोहकडे,प्रा.श्री.अजयकुमार ठाकूर, प्रा.श्री.रावसाहेब शेंडगे,सचिन देसले आदीसह शिक्षक व मान्यवर उपस्थित होते.
श्री  विवेक कोल्हे म्हणाले की, शिक्षक संपूर्ण पिढीला ज्ञानदानाचे काम करत असतात त्यांचे प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी मला अनेकांनी नाशिक शिक्षक मतदार संघाची निवडणूक लढवावी म्हणून गळ घातली ,त्या मागणी प्रमाणे विधानपरिषद लढवण्याचा मी निर्णय घेतला आहे.अनेक शिक्षक संघटना,पाच जिल्ह्यातील शिक्षक संस्थाचालक यांच्याशी संवाद साधून त्यांचे प्रश्न जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे.
           
त्यांचे प्रश्न सुटण्यासाठी मला काम करण्याची ही संधी आहे असे मी मानतो.इतर देशांच्या तुलनेत भारताची क्षमता मोठी आहे मात्र शिक्षकांचे प्रश्न सुटत नसतील तर त्यासाठी कुणीतरी पुढे होऊन सक्षम लढणे गरजेचे आहे.आमच्या कुटुंबाचं वसा हा सेवा हाच धर्म आहे त्यानुसार आम्ही तीन पिढ्या कार्यरत आहोत.शिक्षकांचा सन्मान टिकावा आणि त्यांचे प्रश्न सुटावे यासाठी माझे काम असणार आहे. माझी उमेदवारी ही शिक्षकांच्या आशीर्वादाने आहे त्यानुसार मी पूर्ण ताकतीने सकारात्मक कामाच्या रूपाने ही निवडणूक जिंकणार आहे असा विश्वास विवेक कोल्हे यांनी व्यक्त केला.
चौकट 
आपल्या या निवडणुकीत सुधीर तांबे यांचे काही मार्गदर्शन आहे का ? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता निश्चितच पाचही जिल्ह्यात संस्था चालक ,शिक्षक ,संघटना यांच्या भेटी घेतल्या असता सुधीर तांबे यांचे उच्च काम असल्याचे एक प्रमाण दिसले,त्यांच्याकडून खूप काही शिकण्यासारखे आहे व त्यांची साथ आपल्याला आगामी काळात मिळेल असे मत विवेक कोल्हे यांनी व्यक्त केले.
राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed