पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांचे जीवनकार्य देशाला मार्गदर्शक — मा. आ. डॉ. तांबे
यशोधन कार्यालय येथे अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी
संगमनेर । झुंजार न्यूज
सर्व जाती धर्माच्या जनतेला सोबत घेत पाण्याचे महत्त्व ओळखून अहिल्यादेवी होळकर यांनी देशातील अनेक प्रांतात विहिरी, बारवांसह जलसंधारणाची मोठी कामे केली .एक तत्त्वनिष्ठ, आदर्शवादी ,शूर आणि सुधारणावादी राज्यकर्त्या म्हणून त्यांचे जीवन कार्य देशाला सदैव दिशादर्शक असल्याचे गौरवउद्गार नाशिक पदवीधर मतदारसंघाचे मा. आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी काढले असून
विहिरी बारव याचबरोबर स्त्रियांना आर्थिक स्वातंत्र्य देताना त्यांनी जलसंवर्धनासाठी मोठे काम केले असल्याचे प्रतिपादन युवक काँग्रेसच्या अध्यक्षा कॅन्सरतज्ञ डॉ जयश्रीताई थोरात यांनी केले आहे.
काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या यशोधन कार्यालयात पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांची 299 जयंती साजरी करण्यात आली यावेळी ते बोलत होते. या प्रसंगी मा. आमदार डॉ. सुधीर तांबे, डॉ जयश्रीताई थोरात, कारखान्याचे चेअरमन बाबासाहेब ओहोळ, ॲड अशोक हजारे, श्रीराम कु-हे, प्रा बाबा खरात, विष्णुपंत रहाटळ, सुनील गेठे, भास्कर खेमनर, राहुल खेमनर ,उमेश पालवे ,बाजीराव शरमाळे,सौ सुनीता कांदळकर, अण्णासाहेब शेवकर, सुरेश झावरे , सचिन खेमनर , शितल उगलमुगले, तात्याराम कुटे यांचे सह विविध पदाधिकारी उपस्थित होते.

सर्व राष्ट्रीय नेते हे पूर्ण देशवासीयांचा अभिमान असून राष्ट्रीय नेत्यांना एका चौकटीत न अडकवता त्यांच्या विचारातून देश हिताचे काम तरुण पिढीने करावे असे आवाहन त्यांनी केले.

डॉ जयश्रीताई थोरात म्हणाल्या की, अत्यंत शूर योद्धा असलेल्या अहिल्यादेवी होळकर ह्या उत्तम प्रशासक होत्या. गुलामगिरीच्या मानसिकतेतून समाजाला बाहेर काढण्यासाठी त्यांनी अत्यंत धोरणात्मक निर्णय घेतले. महिला या पुरुषांप्रमाणे आदर्शवत कामातून नावलौकिक मिळू शकतात हे अहिल्याबाई होळकर यांनी करून दाखवले. देशातील सर्व महिलांसाठी अत्यंत स्फूर्तीदायी असलेल्या अहिल्यादेवी यांनी पाण्याचे महत्त्व ओळखून अनेक प्रांतांमध्ये विहिरी यांसह अनेक ठिकाणी बांधलेले घाट आजही सर्वांसाठी कुतूहल आणि आकर्षण ठरत असल्याचे त्या म्हणाल्या
यावेळी संगमनेर तालुका व शहरातील विविध कार्यकर्ते उपस्थित होते
