आश्वी । झुंजार न्यूज
2024 शिर्डी लोकसभा निवडणुकीत अंतिम टप्पापर्यत गोंधळ राहिला महायुतीकडून रामदास आठवले व कार्यकर्ते शेवटपर्यंत लढण्यास इच्छुक होते मात्र काही कारणास्तव ही जागा शिंदे गटाला सोडण्यात आली तर महाविकास आघाडीकडून उत्कर्ष रुपवते ह्या इच्छुक होत्या मात्र जागाच्या वाटाघाटीत उबाठा ही जागा देण्यात आल्याने दोन गटाकडून बौध्द समाज नाराज झाला महायुतीकडून रिपाईसह बौध्द समाज तटस्त दिसले तर उत्कर्षा रुपवतेच्या रुपाने वंचित भक्कम उमेदवार मिळाल्याने शिर्डीतून तिरंगी लढत रंगली त्यातूनचं शिडी लोकसभा मतदारसंघात निर्णायक असणारी बौद्ध समाजाची अडीच ते तीन लाख एक गठ्ठा मतदान कशी व कोठे गेली हे येत्या चार तारखेला शिर्डी लोकसभेचा खासदार ठरवणार असल्याने झालेल्या मतदानावरून हे स्पष्ट होणार आहे .

शिर्डी लोकसभा मतदार संघात अनुसूचित जातीची लोकसंख्या जास्त असल्याने हा मतदार संघ २५ वर्षे राखीव करण्यात आला. गेल्या तीन पंचवार्षिक निवडणुकीत बौद्ध समाजाचा हक्काचा असणारा अनुसूचित जातीसाठी राखीव असणारा या मतदारसंघात खा. रामदास आठवले वगळता चर्मकार समाजाला राजकीय पक्षांनी उमेदवारी देऊन खासदार केले. त्यात २००९ ला रामदास आठवलें विरोधात भाऊसाहेब वाकचौरे यांना तर २०१४ व २०१९ च्या निवडणुकीत सदाशिव लोखंडे यांना खासदार केले. या मतदारसंघात प्रस्थापित आमदारांनी बौद्ध समाजाच्या असलेल्या निर्णायक मतांचा फायदा वेळोवेळी आपापल्या विधानसभा क्षेत्रात करून घेतला. मात्र खासदारकीची निवडणूक येताच या समाजाला दुय्यम स्थान देऊन उमेदवार निवडीच्या प्रक्रियेत दूर ठेवले. यामुळे येथील आंबेडकरी समाज मुख्य प्रवाहातून हेतू पुरस्सर दूर फेकला गेला, याची खंत बौद्ध समाजाच्या मनात बसल्याने यावेळी मात्र मनाशी खुणगाठ बांधून आपल्याच समाजाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहायचे व प्रस्थापित पुढाऱ्यांना दाखवून दयायचे की आम्हाला जर बेरजेत धरत नसाल तर आम्ही पण समाज म्हणून आमची ताकत दाखवून देऊ या हेतूने हा समाज निवडणुकीतील मतदान प्रक्रियेत उतरताना दिसला. ठाकरे शिवसेनेकडून भाऊसाहेब वाकचौरे व शिंदे शिवसेनेकडून सदाशिव लोखंडे यांची उमेदवारी जाहीर होताच वंचित बहुजन आघाडीकडून उत्कर्षाताई रुपवते यांना उमेदवारी देण्यात आली. या उमेदवारीमुळे आयती संधी चालून आल्याने ही संधी हुकवायाची नाही म्हणून बौद्ध समाज खूष झाला. इकडे वाकचौरे , लोखंडे यांच्या चबूत वादळ निर्माण झाले. रूपवते नेमकी कुणाची मते खाणार बात ‘तू.. तू मैं.. मैं..’ सुरू झाली. लोखंडे यांना वाटले रुपवते वाकचौरे यांची मते खाणार तर वाकचौरे यांना वाटले रिपाई महायुतीचा घटक पक्ष असल्याने ने लोखंडेची मते खाणार ! या चक्रव्युहातून शेवटपर्यंत दोघेही बाहेर पडलेचं नाहीत. त्याचा फायदा उठवत वंचितच्या उमेदवार उत्कर्षाताई रुपवते यांनी मतदार संघातील प्रत्येक तालुक्यातील मतदाराशी संवाद साधत हे दोन्ही उमेदवार कसे प्रस्थापितांच्या दावणीला बांधले गेले आहेत व माझी उमेदवारी खरोखरच शिडीं लोकसभा मतदार संघाच्या विकासासाठी कशी योग्य आहे हे पटवून देण्यात त्या यशस्वी झाल्या. यावेळी नवतरुण वर्ग चांगल्या संख्येने आकर्षित होताना दिसला तर मतदानासाठी प्रथमच मतदान करण्यास उतरला असताना वंचितची ताकद वाढवून गेली .

मराठा मतदारांना आकर्षित करण्यासाठी त्यांनी मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांची संभाजीनगर येथे भेट घेत षटकार ठोकला, त्यामुळे गरीब मराठा वंचितांच्या बाजूने झुकला गेला. महत्वाचे म्हणजे येथील कोणत्याही आमदाराने आपल्याला लोकसभेपेक्षा विधानसभा महत्वाची म्हणून या समाजाला दुखावले नाही. उत्तर, दक्षिण मतदार संघात रिपाईला विश्वासात घेतले जात नसल्याची नाराजी पदाधिकाऱ्यांनी थेट ना. रामदास आठवले यांचेकडे व्यक्त केली. त्यानंतर प्रकाश आंबेडकर यांनी श्रीरामपूर येथे झालेल्या सभेच्या ठिकाणी आठवले यांनी सभा घ्यावी, असे सुचवले असता मतदार संघातील सर्व बीद्ध समाज वंचितच्या पाठीमागे असल्याने सभेला प्रतिसाद मिळणार नाही, अशी पदाधिकाऱ्यांत कुजबूज होती. शिडींत फक्त बैठक
घेऊन दक्षिण नगर शहरात सभा घेतली गेली. त्यामुळे खा. आठवले शिर्डीत येऊनही बौद्ध समाजावर फारसा प्रभाव पडला नाही. त्यामुळे समाजाची एकी कायम राहिली. गावोगावी कुणाच्या आमिषाची वाट न पाहता मतदारांनी स्वयंस्फुर्तीने मतदानाचा हक्क बजावताना हा समाज अग्रभागी दिसला, बौद्ध समाजाने किती नेटाने वंचितला साथ दिली हे झालेल्या मतदानावरून निकालात स्पष्ट होणार आहे.

बौद्ध समाजाचे अडीज ते तीन लाखाचे मते हे केवल गट – तट विसरुन रुपवते म्हणून पडल्यास तिरंगी लढतीत मात्र चमत्कार होणार हे निश्चित असून जर तरच्या चर्चतून संध्या तरी दिसत असले मात्र या मतांमुळे लोखंडे की वाकचौरे विजयाचा गुलाल घेतात की रुपवते निळ उधळणार हे चार तारखेला समजेल, मात्र निर्णायक मतेमुळे पुढील विधानसभेचे गणित मात्र ठरणार असून आज घडीला बौद्ध समाजाचे स्वतंत्र पडलेल्या या मतामुळे लोखंडे किंवा वाकचौरे हे आपणच मोठ्या मताधिक्याने विजयी होणार हे छाती ठोकपणे ही सागू शकत नाही

