आश्वी । झुंजार न्यूज

सुगांव बु॥ येथे पाण्यात बुडालेल्या व्यक्तीच्या शोधार्थ NDA जवानाच्या सहकार्याकरिता गेलेल्या गणेश मधुकर देशमुख हा जवानासह पाण्यात पाणबुडी उलटून पाण्यात बुडाल्याने जवानासह देशमुख यांस शहिद म्हणून घोषित करावे व कुटुबांस सन्मानपुर्वक शासकिय मदत मिळावी म्हणून जामखेड तालुक्यातील चौंडी येथील आहिल्यादेवी होळकर यांच्या कार्यक्रमास आलेल्या मुख्यमंत्री ना एकनाथ शिंदे यांना रिपाई राज्य उपाध्यक्ष विजयराव वाकचौरे यांनी निवेदन दिले .
यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांना निवेदन देताना गणेश देशमुख यांची सर्व पार्श्वभूमी पालकमंत्री ना राधाकृष्ण विखे पाटील व विजयराव वाकचौरे यांनी समाजावून सांगितली .  
यावेळी केद्रींय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले , मंत्री अतुल सावे , शिवसेना नेते आ संजय शिरसाठ , आ राम शिंदे , रिपाई जिल्हा संपर्क प्रमुख श्रीकांत भालेराव , जिल्हाध्यक्ष सुनिल साळवे , उत्तर महा उपाध्यक्ष अंकुश भैलुमें पत्रकार राजेश गायकवाड आदी उपस्थित होते .
चौकट
गणेश मधुकर देशमुख यास शहीद म्हणून घोषित करावे व शहीद व्यक्तीस जो सन्मान व शासकीय मदत मिळते ती द्यावी अशी मागणी केल्यानंतर  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व मागण्या मान्य करत येत्या कॅबिनेट मीटिंग मध्ये मंजुरी देण्याचे मान्य केले .
राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *