गुणवंत विद्यार्थी व पालकांचा सत्कार समारंभ संपन्न
संगमनेर । झुंजार न्यूज
देशाला संशोधनाची गरज असून शिक्षणातून प्रगती आणि विकास होत असतो. सह्याद्री शिक्षण संस्था बहुजन समाजाच्या तळागाळातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी सातत्याने कार्य करत आहे ,असे प्रतिपादन सह्याद्री शिक्षण संस्थेचे चेअरमन डॉ .सुधीर तांबे यांनी केले.
भाऊसाहेब गुंजाळ पाटील सह्याद्री विद्यालयातील इ.10वी शालांत परीक्षेतील गुणवंत विद्यार्थी आणि पालक सत्कार सोहळ्यात प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते.

भाऊसाहेब गुंजाळ पाटील सह्याद्री विद्यालयाचा मार्च 2024 इ.10 वी शालांत परीक्षेत कु. कानवडे ईश्वरी राजाराम 96 .20 %गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला असून विद्यालयाचा निकाल 97.61% लागला आहे.90 % पेक्षा अधिक 31 विद्यार्थी , विशेष प्राविण्यासह 120 तर प्रथम श्रेणी मध्ये 144 विद्यार्थ्यांनी उज्ज्वल यश संपादन केले.

विद्यालयात कु कानवडे ईश्वरी राजाराम 96.20% गुण मिळवून प्रथम क्रमांक, देशमुख दीप रामराव 95.20% गुण मिळवून द्वितीय क्रमांक, कु . उपरे गौरी संतोष 94.80%गुण मिळवून तृतीय क्रमांक, उगले सार्थक शांताराम 94.60% गुण मिळवून चतुर्थ क्रमांक,कु. कांबळे धनश्री संजय 94.20% मिळून पंचम क्रमांक संपादन केला.

याप्रसंगी गुणवंतविद्यार्थ्यांचा,पालक, आणि मार्गदर्शक शिक्षकांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थेचे सह सेक्रेटरी श्री दत्तात्रय चासकर यांनी गुणवंत विद्यार्थ्यांनी परिश्रम घेऊन मोठे यश संपादन केले असून पुढील दोन वर्ष जिद्द आणि चिकाटीने देदिप्यमान यश प्राप्त करावे असे आवाहन केले.
संस्थेचे रजिस्ट्रार श्री बाबुराव गवांदे सर यांनी सह्याद्री शिक्षण संस्थेत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्व विकासासाठी अभ्यासाबरोबरच शालेय पातळीवर विविध उपक्रम राबवून डायमंड बॅच आणि NEET,JEE या स्पर्धा परीक्षेची तयारी नव्याने सुरू झालेल्या computer science या विषयासाठी उभारण्यात आलेल्या सुसज्ज संगणक लॅब विषयी माहिती विषद करूनअनुभवसंपन्न तज्ज्ञ प्राध्यापकांच्या अध्यापनातून केली आहे,असे सांगितले.

याप्रसंगी सह्याद्री विद्यालय व ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य श्री के जी खेमनर सर , उपमुख्याध्यापिका श्रीमती बुरकुल मॅडम, ज्युनिअर कॉलेजचे डायमंड बॅच विभागाचे प्रमुख प्रा .घोरपडे सर, आयटी विभागाचे प्रा दिघे सर,पर्यवेक्षक श्री भाऊसाहेब सानप, शिक्षक प्रतिनिधी श्री अण्णासाहेब दिघे ,शिक्षक व शिक्षकेत्तर सेवक वृंद, विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्येष्ठ शिक्षक श्री एस एम खेमनर सर यांनी तर आभार प्रदर्शन उपमुख्याध्यापिका श्रीमती बुरकुल मॅडम यांनी केले.
या सर्व विद्यार्थ्यांचे माजी शिक्षण मंत्री आमदार बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे, सौ दुर्गाताई तांबे, डॉ जयश्रीताई थोरात, लक्ष्मणराव कुटे ,आचार्य बाबुराव गावंदे दत्तात्रय चासकर, प्राचार्य के.जी खेमनर आदींनी अभिनंदन केले आहे
