आश्वी । झुंजार न्यूज
संगमनेर तालुक्यातील ज्ञानगंगा विद्यानिकेतन मांची हिल या शाळेचा इयत्ता दहावीचा निकाल शंभर टक्के लागला. निकाल पुढील प्रमाणे प्रथम क्रमांक शिरसाठ ईश्वरी प्रवीण ९५. ८० टक्के, व्दितीय क्रमांक तांदळे केदार संतोष ९४. ६० टक्के, तृतीय क्रमांक भुसाळ निखिल शरद ९३.४० टक्के. मांची हिलच्या विद्यार्थ्यांनी उज्वल व दर्जेदार निकालाची परंपरा कायम ठेवली आहे. यामध्ये ९० टक्के या पुढे १५ विद्यार्थी, ८५ ते ९० च्या दरम्यान २३ विद्यार्थी, ८०ते ८५ दरम्यान ३५ विद्यार्थी, ७५ ते ८० दरम्यान २२ विद्यार्थी, ७० ते ७५ दरम्यान ९ विद्यार्थी असे नेत्रदीपक यश विद्यार्थ्यांनी मिळवलेले आहे.

या यशामागे विद्यार्थ्यांची मेहनत, विषय शिक्षकांचे नाविन्यपूर्ण अध्यापन, संस्थेचे योग्य नियोजन यामुळेच विद्यार्थी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होत आहे. या विद्यार्थ्यांचे संस्थाप्रमुख शाळीग्राम होडगर, संचालिका नीलिमा गुणे, संस्थेचे अध्यक्ष व प्राचार्य विजय पिसे संस्थेचे सर्व अधिकारी पदाधिकारी यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

या विद्यार्थ्यांना माध्यमिक विभागाचे इनचार्ज रवी खेमनर, शीतल सांबरे तसेच विषय शिक्षक किसन हजारे, उपप्राचार्य गंगाधर चिंधे, अलका गोसावी, छाया गाडेकर, सुनिता गंगुले, देवश्री जोशी, पद्मा ताजणे, प्रदीप जगताप, सुशील ओहोळ, देविदास वाळेकर, अनिल जोशी, मोहन वैराळ, शशिकांत गमे, विजय वर्षे या विषय शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. रवींद्र बनगैया, अनिल पवार, इयत्ता तसेच दहावीच्या विद्यार्थ्यांना रवी खेमनर, अलका गोसावी, देवश्री जोशी हे वर्गशिक्षक लाभले होते.

