आश्वी । झुंजार न्यूज
संगमनेर तालुक्यातील पानोडी ( हजारवाडी ) येथील इंजिनिअर सचिन कानिफनाथ कोळेकर यांची महाराष्ट्र शासनाच्या नगरपरिषद प्रशासन संचालनालयात लेखापरीक्षण व लेखा सेवा अधिकारी पदावर निवड झाली .

महाराष्ट्र शासनाच्या नुकत्याच जाहीर झालेल्या निकालात सचिन कानिफनाथ कोळेकर यांची नगरपरिषद प्रशासन संचालनालयात लेखापरीक्षण व लेखा सेवा अधिकारी या पदावर निवड झाली असून
सचिन कोळेकर हे पुण्यातील नामांकित व्ही.आय .आय .टी. इंजिनिअरिंग कॉलेज,पुणे इलेक्ट्रोनिक्स शाखेचे व कोल्हार येथील रयत शिक्षण संस्थेचे न्यू इंग्लिश स्कूल येथे शिक्षण घेतले असून केंद्रप्रमुख कानिफनाथ मारुती कोळेकर यांचे ते चिरंजीव आहेत.

त्यांच्या या खडतर यशातून झालेल्या निवडीने कोल्हार बु॥ व हजारवाडी (पानोडी) येथील नागरिक, शिक्षक व पालक यांनी कोळकर यांचे अभिनंदन केले असून महसूल मंत्री ना राधाकृष्ण विखे पाटील यांनी त्यांचा सत्कार करुन पुढील वाटचालीस शुभेंच्छा दिल्या .

