शिर्डी । झुंजार न्यूज

शिर्डी लोकसभा मतदारसंघातून शिवसेना उद्योग बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या भाऊसाहेब वाकचौरे यांनी ५० हजाराहून अधिक मतांनी विजय मिळविला आहे.
शिर्डी लोकसभा मतदारसंघातील मतदारांनी महाविकास आघाडीचे उमेदवार वाकचौरे यांना विजयी करताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यावर विश्वास दर्शविला आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी कार्यकर्त्यांनी केलेल्या प्रयत्नामुळे या मतदारसंघात पुन्हा एकदा मूळ शिवसेनेची (ठाकरे गट) मशाल पेटली आहे.
नवे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या विषयी मतदारांमध्ये फारशी सहानुभूती नसली तरी राज्यात घडलेले फोडाफोडीचे राजकारण शिर्डीतील
मतदारांना मानवले नाही. अनेक पक्ष बदलून शिवसेनेत पुन्हा प्रवेश केलेल्या वाकचौरे यांना उमेदवारी मिळाल्यानंतर विद्यमान खासदाराविरोधात असलेल्या नाराजीचा फायदा वाकचौरे यांना झाला आहे.
उद्धव ठाकरे यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत मतदारांनी वाकचौरे यांच्या बाजूने कौल दिल्याचे दिसून आले. निवडणूक निकालानंतर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी वाकचौरे यांना शिर्डी लोकसभा मतदारसंघातून निवडून आल्याचे प्रमाणपत्र दिले.
मिळालेली मते – 
भाऊसाहेब राजाराम वाकचौरे ( उबाठा ) = 476900 (+ 50529)
सदाशिव लोखंडे ( शिंदे शिवसेना ) =426371 
उत्कर्षा रुपवते ( वंचित ) = 90929 
भाऊसाहेब रामनाथ वाकचौरे = 14006 
रामचंद्र जाधव ( बहुजन पार्टी )= 7040 
रविंद्र स्वामी = 5537 
अभिजीत पोटे = 4776 
भारत भोसले ( समता पार्टी ) = 3403 
सतिष पवार = 2771 
गंगाधर कदम = 2757 
गोरक्ष बागुल = 2660 
प्रशांत निकम = 2545 
ॲड नितीन पोळ ( बहुजन पार्टी ) =2532
राजेंद्र वाघमारे ( RJP ) = 2505 
ॲड सिध्दार्थ बोधक = 2204 
चंद्रकांत दौंडे = 2080 
अशोक अल्हाट = 1798 
विजयराव खाजेकर = 1557 
नचिकेत खरात =1150 
संजय भालेराव = 963 
राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed