फटाक्यांच्या आतषबाजी व गुलालांची वळण करून महाविकास आघाडीच्या विजयी उमेदवारांचे अभिनंदन

संगमनेर । झुंजार न्यूज

 

काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात खासदार निलेश लंके व शिर्डी लोकसभा मतदारसंघांमध्ये खासदार भाऊसाहेब वाकचौरे हे मोठ्या मताधिक्याने विजयी झाले असून राज्यात महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी झाल्याचा आनंद कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहाने साजरा झाला. यावेळी गुलालांची उधळण व फटाक्यांची आतिषबाजी करत कार्यकर्त्यांनी पेढे व जिलेबी वाटून आपला आनंद साजरा केला.

 

काँग्रेस पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या यशोधन कार्यालयासमोर मोठा जल्लोष करण्यात आला. यावेळी आमदार बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ सुधीर तांबे ,सौ दुर्गाताई तांबे ,युवक काँग्रेसचे अध्यक्ष डॉ जयश्रीताई थोरात, रणजीत सिंह देशमुख, विश्वासराव मुर्तडक, सोमेश्वर दिवटे, निखिल पापडेजा,  संतोष हासे, रामहरी कातोरे ,अजय फटांगरे, सुभाष सांगळे, जावेद शेख, वैष्णव मुर्तडक, सौ अर्चनाताई बालोडे ,सौ प्रमिलाताई अभंग, सौ दिपाली वर्पे, आदींसह काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना यांचा युवक काँग्रेसचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

महाविकास आघाडीला अनुकूल निकाल येताच सर्व कार्यकर्त्यांनी यशोधन कार्यालयाकडे धाव घेतली. यावेळी फटाक्यांची आतिषबाजी करून गुलालाची उधळण करत कार्यकर्त्यांनी ढोल ताशांच्या गजरात जल्लोष केला.

 

यावेळी आमदार थोरात म्हणाले की, हा विजय सर्वसामान्य जनतेचा असून सरकारचे चुकीचे धोरणे आणि राज्यात चुकीच्या पद्धतीने आलेल्या सरकार याविरुद्ध जनतेने रोष व्यक्त केला आहे. काँग्रेसचा विचार हा शाश्वत असून सर्वांनी या विचाराच्या पाठीशी सोबत राहावे असे आवाहन करताना आगामी काळात राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

 

तर मा. आमदार डॉ तांबे म्हणाले की, भाजपा सरकार देशांमध्ये एकाधिकारशाही निर्माण करू पाहत होते .मात्र समाजामध्ये निर्माण केली जाणारी द्वेष भावना आणि धार्मिकतेचे राजकारण जनतेला पसंत पडले नसून या विरोधी जनतेने मोठा कौल दिला आहे.

 

तर डॉ जयश्रीताई थोरात म्हणाले की, भाजप सरकारने युवकांना फसवले .दोन कोटी नोकऱ्या तर सोडाच परंतु महाराष्ट्रातून अनेक उद्योग इतर राज्यांमध्ये पळवले. हे सर्वसामान्य जनतेला आणि तरुणांनी आवडले नसल्यामुळे तरुणाई पूर्ण भाजप सरकारच्या विरोधात ठामपणे उभी राहिली असल्याच्या त्या म्हणाल्या.

 

तर सौ.दुर्गाताई तांबे म्हणाल्या की, भाजपच्या काळात महिला सुरक्षित नसून मणिपूरमध्ये झालेल्या महिलांच्या अत्याचारा विरोधात देशातील महिला एकवटल्या आहेत. यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.

चौकट

लोकसभा निवडणुकीत आमदार थोरात यांच्या प्रचाराला यश

महाविकास आघाडीचे प्रमुख नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी लोकसभा निवडणुकीमध्ये रामटेक, नागपूर ,गडचिरोली, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, याचबरोबर मराठवाड्यात नांदेड, हिंगोली, परभणी ,जालना, औरंगाबाद, उत्तर महाराष्ट्रात धुळे, जळगाव, नंदुरबार ,नाशिक, अहमदनगर, शिर्डी ,पश्चिम महाराष्ट्र मध्ये पुणे, शिरूर, कोल्हापूर ,सांगली ,सातारा, हातकणंगले,मुंबई, ठाणे, पालघर, अशा विविध ठिकाणी सभा घेतल्या यामध्ये अनेक महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी झाले असून अनेकांनी आमदार थोरात यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त केली असून संगमनेरकरांचा हा गौरव असल्याची प्रतिक्रिया सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी व महिलांनी व्यक्त केली आहे

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed