{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":["local"],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":false,"containsFTESticker":false}

 

सहवासातले आठवले पुस्तकाचे माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे , मंत्री छगनराव भूजबळ यांच्या हस्ते प्रकाशन !

 

 

 

मुंबई । झुंजार न्यूज

 

 

मी तसा कुणाचाही नाही हस्तक म्हणून माझ्यावर निघत आहे पुस्तक माझे नेहमी शांत असते मस्तक अशी काव्यमय सुरुवात रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रिय राज्यमंत्री ना.रामदास आठवलेंनी केली.

 

 

डॉ बाबासाहेब नसते तर आम्ही कुठेच नसतो .आंबेडकरी विचारांवर निष्ठा ठेवून भारतीय दलित पँथर द्वारे आम्ही सातत्याने संघर्ष केला.त्या चळवळीत माझ्या सोबत असंख्य कार्यकर्ते जोडले गेले,ही जी कार्यकर्त्यांचे ताकद आहे तीच माझी संपत्ती आहे . कमावलेली माणुसकी आणि माणसं हीच माझी खरी संपत्ती आहे.असे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी व्यक्त केले.

 

 

वरळी येथील नेहरू तारांगण येतील एका सभागृहात काल शनिवारी दि.२९ जून रोजी रात्री सहवासातले आठवले या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.

 

 

या पुस्तक प्रकाशन सोहळ्यास माजी केंद्रीय गृह मंत्री सुशीलकुमार शिंदे, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, आमदार प्रवीण दरेकर , शरणकुमार लिंबाळे , माजी मंत्री अविनाश महातेकर, गौतम सोनवणे, सिद्धार्थ कासारे, विवेक पवार , पप्पू कागदे , श्रीकांत भालेराव , उत्तम कांबळे , राजेंद्र खरात नवनित लोंढे , नगरसेवक बाळासाहेब ओव्हाळ , सौ.सीमाताई आठवले , विजयराव वाकचौरे , सुनिल साळवे , सुनिल मोरे , प्रविण मोरे , सचिन मोहिते आणि आठवले कुटुंबीय उपस्थित होते.

 

तसेच रिपब्लिकन पक्षाचे अनेक मान्यवर उपस्थित होते.
सहवासातले आठवले हे पुस्तक रिपब्लिकन कार्यकर्त्यांनी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्याबद्दल लिहिलेले अनुभव आहेत. त्याचे संकलन चंद्रमणी जाधव आणि प्रवीण मोरे यांनी या पुस्तकात केले आहे.

 

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *