कोपरगांव । झुंजार न्यूज

कोपरगांव तालुक्यातील संवत्सर बिरोबाचौक येथील राजेंद्र भाऊसाहेब शिंदे यांच्या घरी दुसऱ्यांदा ब्रम्हकमळ फुलले, शिंदे कुटूंबियांनी त्याची मनोभावे पुजा करून ते ऐतिहासिक प्राचिन शृंगेश्वर व नदी काठावरील महादेव मंदिरात महामस्तकाभिषेक करून अर्पण केले.
     
       
याबाबतची माहिती अशी की, राजेंद्र भाऊसाहेब शिंदे यांच्या पत्नी सौ. दिपाली यांनी थेट सातारा येथून चार वर्षापूर्वी ब्रम्हकमळ रोपाची काडी आणून त्याचे संवत्सर (बिरोबाचौक) येथे रोपण केले. त्यांचे चिरंजीव शंभु व आई श्रीमती तारामती भाऊसाहेब शिंदे यांनी ब्रम्हकमळाची काळजी घेतली.
या रोपास यापूर्वी १७ सप्टेंबर २०२३ रोजी हरितालतीक मुहूर्तावर  एक फुल मध्यरात्री उमलले होते. आता दुसऱ्यांदा फुल उमलल्याबरोबर वस्ती, पंचक्रोशीत त्याचा सुवास दरवळू लागला आसपासच्या महिला भगिनींनी हे कमळ पाहण्यासाठी गर्दी केली होती. सौ. मंजुश्री धनंजय शिंदे व सौ. दिपाली राजेंद्र शिंदे यांनी विधीवत ब्रह्मकमळाचे पुजन केले.
ब्रम्हकमळ ही दुर्मिळ वनस्पती असून ती हिमालयातील उत्तराखंड येथे आढळते. ते हिमालयाचे राज्यपुष्प आहे बद्रीनाथ केदारनाथला हे ब्रम्हकमळ वाहतात
राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed