{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":["local"],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{"addons":1},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":true,"containsFTESticker":false}

 

लोणी । झुंजार न्यूज 

वारकऱ्यांचा श्वास असलेल्या पंढरीच्या वारीची महती सांगावी तितकी कमीच आहे. वारी ही बघण्यापेक्षा अनुभवण्याची गोष्ट आहे. पायी जाणाऱ्या वारकऱ्यांप्रमाणेच नाशिकमधील तरुण महिला – तरुण पुरुष व काही वयोवृध्दासह 250 सायकलप्रेमींनी नाशिक-पंढरपूर- अशी 350 किमीची सायकल वारी तीन दिवसात पूर्ण करणार आहे पहिल्या दिवशीय लोणी येथील युवकांनी त्यांच्या नाष्टाची पोलिस स्टेशन प्रांगणात सुविधा केली होती .

 

यावेळी त्यांनी मार्गावर भेटलेल्या सर्वांना पर्यावरण रक्षण आणि आरोग्यासाठी सायकल चालवण्याचे महत्व पटवून दिले. हा वेगळा आणि खूपच आनंददायी अनुभव असल्याचेही या सायकलपटूंनी सांगितले. पंढरपूर वारीत सायकल चालवत पर्यावरण जागृतीचा संदेश त्यांनी यावेळी प्रत्येकापर्यंत पोहोचवला. नाशिक येथून पहिल्यांदाचं रॉयल राईडर संस्थेच्या माध्यमातून डॉ आंबा पाटील यांच्या नेतृत्वाखाली तरुण महिला , पुरुष व वृध्दासह 250 जणांनी सायकल द्रारे  पंढरपूरीची वारी करण्याचे ठरवत शुक्रवार सकाळी नाशिकहून मार्गस्थ झाले . दुपारी 12 वाजता ते लोणी पोलिस स्टेशनमध्ये ग्रुप ग्रुपने दाखल झाले यावेळी लोणी पोलिस स्टेशनचे पो. नि . कैलास वाघ , सामाजिक कार्यकर्ते दिपक धावणे यांनी त्यांचे स्वागत केले व विविध प्रकारे नाष्टा उपहार त्यांना दिला .  या आषाढी वारीमध्ये मोठ्याप्रमाणावर वारकरी समुदाय सहभागी होत असतो. पंढरपूरची ही वारी एक उत्सव असतो. मात्र पहिल्यांदाचं सायकलवारी ते ही तरुण महीलासह वयोवृध्द व पुरुषाचा सायकल वारी हे आश्चर्यकारक ठरले .

डॉ आंबा पाटील यांनी सांगितले की , पंढरपुरच्या वारीमध्ये सहभागी व्हावे, अशी अनेक वर्षांपासूनची इच्छा होती; परंतु जास्त दिवस सुट्टी घेता येत नसल्यामुळे आम्ही नाशिक – पंढरपूर या 350 किमीच्या वारी करण्याचं ठरवल व दोन महीन्यापासून तयारी सुरु केली इच्छुकांना वारीचे आवाहन करत त्यांना येणाऱ्या अडचणी यावर मार्गदर्शन करण्यात आले त्यानंतर शुक्रवारी सायकलवारी सुरु केली वारी बरोबर डॉक्टर , सायकल डॉक्टर असे मार्गदर्शक ठेवण्यात आले . .

oplus_2

यामध्ये एक दिवस आम्ही प्रती 150 किमी सायकल चालवत सिन्नर , लोणी , राहुरी येथे नाष्टा भोजन व्यवस्था करण्यात आली तर पहिला मुक्काम नगर येथे ठेवून दुसरा मुक्काम करमळा येथे असणार तर तिसऱ्या दिवशी पंढरपूरमध्ये जाणार असे सांगण्यात आले . यासाठी आम्ही काही दिवसांपासून सायकल चालवण्याचा सराव करत होतो. वारी मार्गावर ठिकठिकाणी ग्रामस्थांकडून आमचे स्वागत, पाहुणचार, गप्पागोष्टी झाल्या. आम्हीही या सर्वांना पर्यावरण रक्षण आणि आरोग्यासाठी सायकल चालवण्याचे महत्व पटवून दिले, अशी माहिती क्लबच्या सदस्यांनी दिली

oplus_2

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed