संगमनेर । झुंजार न्यूज
संगमनेर तालुक्यातील एकूण दहा रस्त्यांना पालकमंत्री ना.श्री.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पाठपुराव्यातून 11 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्याने ग्रामीण भागातील रस्ते विकासाचा मोठा प्रश्न मार्गी लागला आहे.
सुरु असलेल्या पावसाळी अधिवेशनात सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पामध्ये या रस्त्यांसाठी निधी मंजूर झाला आहे. यासाठी या रस्त्यांच्या कामासाठी निधी उपलब्ध व्हावा म्हणून जिल्ह्याचे पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून प्रस्ताव सादर करण्यात आले होते. यापैकी एकूण ८ रस्त्यांना ११ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल आहे.
यामध्ये तालुक्यातील निमगाव टेंभी ते हिवरगाव रस्त्यासाठी २ कोटी ५० लाख, राष्ट्रीय महामार्ग ५० ते राजापूर रस्त्याला १ कोटी २५ लाख तर खांबे ते म्हैसगाव रस्त्याला १ कोटी २५ लाख, निमोण ते तालुका हद्द निऱ्हाळे रस्त्याला १ कोटी २५ लाख तसेच धांदरफळ बुद्रुक ते कारमळा रस्त्याला ८० लाख रुपये तर मालुंजे ते अंभोरे रस्त्याला १ कोटी रुपये, तिगाव ते वडझरी बु. रस्त्याला १ कोटी तसेच मेंढवण ते कोकणगाव रस्त्यासाठी २ कोटी रुपये मंजूर झाला असल्याची माहिती पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.
यापूर्वीही तालुक्यातील विविध विकास कामांकरीता मंत्री विखे पाटील यांनी भरघोस निधीची उपलब्धता करुन दिली आहे. व्यक्तिगत लाभाचा पाठपुरावा देखील सातत्याने होत असल्याने लाभार्थ्यांना या योजनांचा मोठ्या प्रमाणात लाभ मिळाला आहे. रस्त्यांच्या कामांकरीता ११ कोटी रुपयांचा निधी उलपब्ध करुन दिल्याबद्दल संबंधित ग्रामस्थांनी विखे पाटील यांचे आभार मानले आहे.
