आश्वी l झुंजार न्यूज
शिक्षणामुळे व्यक्ती स्वतंत्र होण्यास मदत होते. जेव्हा एखादी व्यक्ती पुरेशी शिक्षित असते तेव्हा त्यांना त्यांच्या उदरनिर्वाहासाठी इतर कोणावर अवलंबून राहावे लागत नाही. ते स्वत:साठी कमावण्यास आणि एक सभ्य जीवन जगण्यासाठी स्वयंपूर्ण असतात. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, शिक्षणामुळे व्यक्तीचा आत्मविश्वास वाढतो. जर आपण देशांच्या दृष्टिकोनातून विचार केला तर तेव्हा शिक्षणाची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. सुशिक्षित लोक देशाच्या चांगल्या उमेदवाराला मतदान करतात ज्यामुळे राष्ट्राची वाढ आणि विकास सुनिश्चित होते असल्याचे मत आश्वी बु येथील उपसरपंच अरूणा हिंगे यांनी व्यक्त केले.

संगमनेर तालुक्यातील आश्वी बु येथील जिल्हा परीषद प्राथमिक शाळा मुले व मुलींच्या वतीने आषाढी यात्रे निमित्याने गावातुन शौक्षणिक दिंडीचे आयोजन करण्यात आले होते.याप्रंसगी हिगे बोलत होत्या. कपाळास टिळा, गळ्यात तुळशीची माळ व मुखाने हरिनाम म्हणत विद्यार्थी वारकरी गावातुन दिंडी काढत वृक्ष लागवड, शिक्षणाचे महत्व यावरोबरच आध्यत्माचे महत्व दिंडीतुन सांगत होते .

यावेळी सरपंच नामदेव शिंदे, माजी सरपंच हरिभाऊ ताजणे, उपसरपंच अरूणा हिंगे प्रवरा बॅकेचे संचालक संजय गांधी,ग्रां.प.सदस्य भाऊसाहेब खेमनर,बबनराव शिंदे विनायक बालोटे,मुख्याध्यपक रामदास ढगे, भाऊसाहेब गिते, हैशिराम मेचकर,संगिता क्षिरसागर,लता बिडवे दिलीप शिंदे,विजया लांडगे,वर्षा कुऱ्हाडे,रंजना शिंदे आदी उपस्थित होते. विद्यार्थी वारकऱ्यांना यावेळी सुशील भंडारी, संजय गांधी यांच्याकडुन अल्पोपहार देण्यात आला .

तर सर्व उपस्थित वारकरी विद्यार्थीना व ग्रामस्थांना चहा पाण संजय पंडुरे यांनी दिला .
