पंढरपूर : झुंजार न्यूज

 

आषाढी एकादशीच्या दिवशी पहाटे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक श्री विठ्ठलाची शासकीय महापूजा केली. याप्रसंगी त्यांनी राज्यातील जनतेला सुखी-समाधानी ठेवण्याचे साकडे घातले.

 

आषाढी एकादशीच्या निमित्ताने आज महाराष्ट्राचे आराध्य दैवत असणार्‍या श्रीविठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी लाखो भाविकांची मांदियाळी दिसून येत आहे. कालपासूनच राज्यच नव्हे तर देशाच्या कान्याकोपर्‍यातून लाखो आबालवृध्द भाविक पंढरपुरात दाखल झाले. पहाटे अडीच वाजेपासून श्री विठ्ठल-रखुमाई यांचे पूजन सुरू झाले.

 

 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या सौभाग्यवतींसह मुख्य शासकीय पूजा केली. याप्रसंगी ना. गिरीश महाजन, ना. चंद्रकांत पाटील, ना. दीपक केसरकर आदींसह राजकीय व प्रशासकीय क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती.

 

 

दरम्यान, गेल्या सोळा वर्षांपासून नियमीतपणे पंढरीची वारी करणार्‍या सटाणा तालुक्यातल्या अंबासन येथीर रहिवासी शेतकरी बाळू शंकर अहिरे (वय ५५ वर्षे) आणि त्यांची पत्नी आशाबाई बाळू अहिरे (वय ५० वर्षे) यांना पुजेचा मान मिळाला. तर, लागोपाठ तिसर्‍यांना पंढरपुरात पुजा करण्याचे भाग्य आपल्याला लाभल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आनंद व्यक्त केला. राज्यातील जनता सुखी होऊ दे. राज्यातील प्रत्येक घटक यांच्या जीवनात आनंदाचे दिवस विठ्ठलाने आणावे असं मागणं देखील मागितल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. राज्यातील बळीराजाला चांगले दिवस येऊ दे, त्याचं पिक चांगलं येऊ दे, चांगला पाऊस येऊ दे शेतकर्‍यांच्या जीवनात सोन्याचे दिवस येऊ दे असे साकडे आपण श्री विठ्ठलाला घातल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याप्रसंगी दिली

 

 

पंढरीत येणाऱ्या भाविकांना सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून देणार आहे. संत निळोबाराय यांच्या पालखी सोहळ्यात पायी चालण्याचे भाग्य मिळाले. यातून जो आनंद मिळाला तो शब्दात वर्णन करता येणार नाही असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. त्यांनी आषाढी यात्रेच्या नियोजनाची पाहणी करून प्रशासनास सूचना दिल्या.

 

 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंढरपूरचा दौरा केला. पंढरपूर जवळ असलेल्या करकंब येथे संत निळोबाराय यांची पालखी आली होती. या पालखी सोहळ्यात मुख्यमंत्री शिंदे, मंत्री गिरीश महाजन, दादा भूसे हे देखील काही अंतर पायी चालले. हातात टाळ आणि मुखी हरी नाम करत पायी चालले. या वेळी भाविकांनी देखील मोठ्या उत्साहात सहभागी झाले.

त्यानंतर मुख्यमंत्री यांनी चंद्रभागा नदीच्या पैलतीरावरील ६५ एकर जागेची पाहणी केली. या ठिकाणी अनेक भाविक मुक्कामी आहेत. त्यांच्या राहूटी , पिण्याचे पाणी आदी व्यवस्थेची पाहणी केली. तसेच त्यांनी चंद्रभागा नदीच्या पात्रात पाय धुऊन पवित्र तीर्थ मस्तकी लावले. या नंतर त्यांनी वाळवंट , दर्शन रांग यांची पाहणी केली. दर्शन रांगेतील भाविकांशी संवाद साधत काही अडचण आहे का ? असे विचारल्यावर भाविकांनी उत्तम सोय केली असून तुमचे आभार असे म्हणत रांगेतील भाविकांनी विठ्ठल विठ्ठल चा जयघोष केला. या वेळी त्यांनी प्रशासनाला काही सूचना व बदल सांगितले. असे असले तरी मुख्यमंत्री यांची पायी वारी चालण्याची इच्छा पूर्ण झाली .

मुख्यमंत्री यांनी केली बुलेट स्वारी
मुख्यमंत्री शिंदे यांनी पंढरपूर शहरात चक्क बुलेट वरून फिरले. आमदार समाधान आवाडे यांनी सारथ्य केले. पावसाच्या रिमझिम पडत असताना आणि भाविकांची गर्दी पाहता बुलेट वरून फिरल्याने चर्चा होत आहे”

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *