संगमनेर । झुंजार न्यूज 

 

अमृतवाहिनी निडो इंटरनॅशनल स्कूलच्या कु.राजवीर गडाख, इयत्ता ३ री याने शैक्षणिक वर्ष ( २०२४ – २५ ) च्या राष्ट्रीय विज्ञान ऑलिम्पियाड परीक्षेमध्ये उल्लेखनीय यश मिळविले आहे.

 

अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्थेचे,निडो स्कूल नेहमीच गुणवत्तापूर्ण शिक्षणाबरोबर विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्व विकासासाठी कार्यरत असते. सातत्यपूर्ण शिक्षणाच्या आधारे  राजवीर ने जिद्द,चिकाटी व परिश्रम घेऊन आंतरराष्ट्रीय ६ वा क्रमांक आणि विभागीय ६ वा क्रमांक मिळविला आहे. राजवीरच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे त्याला विभागीय कास्यपदक, प्रमाणपत्र आणि १००० रु. रोख रक्कम  पुस्तकांसाठी मिळाली.

 

 

‘डॉक्टर्स डे’ निमित्त एस एम बी टी डेंटल कॉलेज, संगमनेरच्या डेंटिस्ट टीमने, डॉ. विनया कुलकर्णी, डॉ. किशोर पाटील तसेच अमृतवाहिनी संस्थेच्या विश्वस्त सौ.शरयू देशमुख, स्कूलच्या संचालिका सौ. अंजली कन्नावार  यांनी राजवीरच्या अतुलनीय कामगिरीबद्दल  कौतुक करून भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा दिल्या.

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed