जेव्हा कॅन्सरतज्ञ डॉ.जयश्रीताई थोरात शिक्षक होतात

संगमनेर । झुंजार न्यूज

 

 

भारतरत्न डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांनी प्रत्येकाला थ्रीडी मधून यशाचा मंत्र दिला आहे ड्रीम, डिझायर, आणि डेडिकेशन याचे पालन करा. याचबरोबर यशस्वी होण्यासाठी प्रत्येकाने आपल्या मोठ्या स्वप्नांना मेहनतीचे बळ द्या असा सल्ला कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्रीताई थोरात यांनी विद्यार्थिनींना दिला आहे.

देवकौठे येथे महिलांशी संवाद साधल्यानंतर डॉ. जयाताई थोरात यांनी रमाजी गेणुजी पा. कहांडळ विद्यालयात जाऊन विद्यार्थिनींचा वर्ग घेतला. यावेळी मुख्याध्यापक संजय लहारे युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष सुभाष सांगळे, सोसायटीचे माजी चेअरमन राजेंद्र कहांडळ ,राजेंद्र मुंगसे, ज्ञानेश्वर मुंगसे, नामदेव कहांडळ, अजित शेवकर, अनिल गाजरे, सुरेश मुंगसे ,शत्रुघ्न मुंगसे, सागर गाजरे शांताराम आरोटे, दत्तू दादा मुंगसे, शरद शेवंते आदि उपस्थित होते.

यावेळी संवाद साधताना डॉ.जयाताई थोरात म्हणाल्या की, प्रत्येकाने झोप उडवणारी स्वप्न पाहिली पाहिजेत आणि ती स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी अंतकरणापासून मेहनत केली पाहिजे. यश तुमच्या पायाशी असेल.ग्रामीण भागामध्ये मोठी गुणवत्ता असून त्यांना योग्य संधी मिळाल्यास ते मोठे नावलौकिक निर्माण करतात देवकौठे गावाने मोठ्या कष्टातून पोल्ट्री आणि दूध व्यवसायातून आर्थिक समृद्धी निर्माण केली आहे.

संगमनेर तालुका हा विस्ताराने खूप मोठा असूनही आमदार बाळासाहेब थोरात यांनी प्रत्येक गावच्या वाडी वस्तीवर विकासाच्या योजना राबवल्या आहेत देवकवठे ते बोटा असा एकशे दहा किलोमीटरचा असलेला हा विस्तीर्ण तालुका विकासातून मॉडेल ठरला आहे. ही विकासाची परंपरा जपताना नवीन पिढी अधिक गुणवंत आणि समृद्ध होईल यासाठी सर्वांनी काम करावे असे आवाहन केले.

 

तर सुभाष सांगळे म्हणाले की,आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली सातत्याने गावात विकासाच्या योजना राबवल्या जात असून विद्यार्थिनी करता शाळेतून विशेष उपक्रम राबवले जात आहेत.

 

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक संजय लहारे यांनी केले सूत्रसंचालन शरद शेवंते यांनी केले तर राजेंद्र कहांडळ यांनी आभार मानले .

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *