संगमनेर l झुंजार न्यूज
“फ्रान्सची राजधानी पॅरिस येथे सुरू असलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत भारताची नेमबाज मनू भाकर हीने महिलांच्या १० मीटर एअर पिस्तुल क्रीडा प्रकारात भारताला स्पर्धेतील पहिले ऑलिम्पिक पदक जिंकून दिले आहे. मनू भाकर हिने जिंकलेले कांस्यपदक ही देशासाठी चांगली सुरुवात असून या यशाने देशवासीयांच्या आशा अधिक उंचावल्या तर यातून मुलीना प्रेरणा मिळणार असल्याचे वंचित बहुजन आघाडीचे राज्य प्रवक्ता उत्कर्षाताई रुपवते यांनी मनू भाकर हीचे मनःपूर्वक अभिनंदन केले .

येणाऱ्या काळात भारतीय खेळाडू अधिकाधिक पदके जिंकतील आणि त्यात महाराष्ट्राचा वाटा मोठा असेल, असा विश्वास व्यक्त करत ऑलिम्पिक स्पर्धेत पदक जिंकणारी मनु भाकर ही पहिली महिला नेमबाज ठरली आहे, हे सुद्धा या पदकाचे वैशिष्ट्य आहे .

मनू भाकर हिचे पुन:श्च अभिनंदन करत भारतीय ऑलिम्पिक पदकाला अधिकाधिक पदके जिंकण्यासाठी मनापासून शुभेच्छा…,” अशा शब्दांत उत्कर्षा रुपवते यांनी पॅरिस ऑलिम्पिकमध्ये देशाला स्पर्धेतील पहिले पदक जिंकून देणाऱ्या कांस्यपदक विजेत्या नेमबाज मनू भाकर हिचे अभिनंदन केले आहे.
