आ.बाळासाहेब थोरात व सौ.कांचनताई थोरात यांच्या हस्ते पूजन
संगमनेर | झुंजार न्यूज
देशातील सहकारासाठी मापदंड ठरणाऱ्या सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या नवीन प्रशासकीय इमारतीची पूजा सोमवार दिनांक 19 ऑगस्ट 2024 रोजी दुपारी 2 वा.काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते तथा राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य आमदार बाळासाहेब थोरात व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ कांचनताई थोरात यांच्या हस्ते दुपारी 2 वा.होणार असल्याची माहिती चेअरमन बाबासाहेब ओहोळ यांनी दिली आहे.

याबाबत अधिक माहिती देताना ओहोळ म्हणाले की, आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली थोरात कारखान्याने अत्यंत अडचणीतही यावर्षी दहा लाख मेट्रिक टना पेक्षा जास्त गाळप केले, कडक शिस्त, पारदर्शक कारभार, गुणवत्तापूर्ण काम यामुळे कारखान्याचा देश पातळीवर लौकिक असून कारखान्याने अद्यावत अशी प्रशासकीय इमारत उभी केली आहे.

या नवीन इमारतीची वास्तुशांती तथा पूजन श्रावण महिन्यातील पवित्र अशा तिसरा सोमवार तथा रक्षाबंधनाच्या दिवशी 19 ऑगस्ट 2024 रोजी दुपारी 2 वा. आमदार बाळासाहेब थोरात व सौ कांचनताई थोरात यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी मा. आमदार डॉ सुधीर तांबे, सौ दुर्गाताई तांबे, आमदार सत्यजित तांबे, ॲड माधवराव कानवडे, रणजीतसिंह देशमुख, इंद्रजीत भाऊ थोरात, संपतराव डोंगरे, शंकरराव खेमनर, कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्रीताई थोरात, बाजीराव पा. खेमनर, सुधाकर जोशी, रामहरी कातोरे, हौशीराम सोनवणे, राजेंद्र कडलग, मिलिंद कानवडे ,सोमेश्वर दिवटे, यांच्यासह काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी तसेच जिल्हा परिषदेचे सदस्य व पंचायत समितीचे सर्व सदस्य, अमृत उद्योग समूहातील विविध संस्थांचे पदाधिकारी अधिकारी उपस्थित राहणार आहेत.

तरी संगमनेर शहराच्या वैभवात भर टाकणाऱ्या या नवीन वास्तूच्या पूजन प्रसंगी आपण सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन व्हाईस चेअरमन संतोष हासे, कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर, व कारखान्याच्या सर्व संचालक मंडळांने केले आहे.

