आश्वी l झुंजार न्यूज
केंद्रीय मंत्री ना .रामदास आठवले यांच्य नेतृत्वाखालील रिपब्लिकन पक्षाची अहिल्यानगर दक्षिण जिल्हा कार्यकारिणीची अतिशय महत्त्वपुर्ण बैठक सोमवार दि १९ ऑगस्ट २०२४ रोजी दुपारी १२ वाजता जिल्हा संपर्क प्रमुख तथा राज्य उपाध्यक्ष श्रीकांत भालेराव यांच्या अध्यक्षतेखाली व शासकिय विश्रामगृह येथे होणार असल्याची माहिती प्रदेश उपाध्यक्ष विजयराव वाकचौरे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्रारे दिली .

प्रसिध्दी पत्रकात विजयराव वाकचौरे पुढे म्हणाले की , नुकत्याचं लोकसभेच्या निवडणुका झाल्या . यात रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांना मित्र पक्षांने विश्वासात घेतले नव्हते मात्र केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या आदेशाने कार्यकर्त्यांनी ” राजा बोले दल हले ” या पध्दतीने कामे केली . आता विधानसभेच्या निवडणुका काही दिवसातचं येवून ठेपल्या असल्याने कार्यकर्त्यांची मळगळ दूर करण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाच्या दक्षिण विभागाची बैठक आयोजित केली असून या बैठकीत दक्षिण विभागांची नाविन्य रचना ( नविन कार्यकारणी ) , लोकसभा निवडणुक आढावा , आगामी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीची दिशादर्शक भूमिका , सभासद नोंदणी व श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघ पक्षाकरिता निश्चित हवा आदी विषयावर सखोल चर्चा होणार असून या होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत कार्यकर्त्यांला सन्मान पुर्वक वागणुक व संधी मिळावी तसे लोकसभेप्रमाणे उडवा – उडवीचे उत्तरे , चल पुढे – चल पुढे खपवून घेतले जाणार नसल्याने हीचं निवडणुकी पुर्व तयारी म्हणून जुन्या – नव्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी तसेचं रि.पा.ई (आठवले ) पक्षाला सलग्न असणाऱ्या सर्व आघाडीचे जिल्हा अध्यक्ष , तालुकाध्यक्ष , विधानसभाध्यक्षांनी या ” कार्यकर्ता समन्वय बैठकीला सोमवार दिनांक १९ ऑगस्ट २०२४ (19/08/2024) रोजी दुपारी १२ वाजता शासकिय विश्रामगृह नगर – औरंगाबाद रस्ता अहिल्यादेवीनगर (अहमदनगर ) येथे उपस्थित रहावे असे आवाहन विजयराव वाकचौरे यांनी केले आहे .
