ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना संधी मिळाली तर ते जग जिंकू शकतात,” या विचारावर विश्वास ठेवून शिक्षण, कौशल्य विकास, उद्योजकता आणि सामाजिक बांधिलकी यांचा समन्वय साधणारे महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री तथा अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार डाॅ.राधाकृष्ण विखे पाटील यांनी गेल्या अनेक वर्षांत शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य उभे केले आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या शैक्षणिक आणि सामाजिक योगदानाचा घेतलेला हा मागोवा केवळ गौरवाचा विषय नसून ग्रामीण भागासाठी प्रेरणेचा स्रोत आहे.

ग्रामीण शिक्षणाला आधुनिकतेची जोड

लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांनी दिली. या शिक्षण चळवळीला अधिक व्यापक स्वरूप देण्याचे काम डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शहरातील विद्यार्थ्यांप्रमाणे दर्जेदार शिक्षण मिळावे, यासाठी प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या माध्यमातून शाळा, महाविद्यालये, व्यावसायिक शिक्षण संस्था, अभियांत्रिकी, वैद्यकीय, कृषी, नर्सिंग, व्यवस्थापन आणि तंत्रशिक्षणाच्या विविध शाखा विकसित करण्यात आल्या.

आज हजारो विद्यार्थी ग्रामीण भागातून शिक्षण घेऊन देश-विदेशात विविध क्षेत्रांत यशस्वीपणे कार्यरत आहेत. शिक्षण केवळ पदवी मिळविण्यापुरते मर्यादित न राहता व्यक्तिमत्त्व विकासाचे माध्यम बनावे, यासाठी संस्थेमध्ये विविध उपक्रम राबविले जातात.

 

स्पर्धा परीक्षा केंद्रातून घडत आहेत अधिकारी ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता असूनही योग्य मार्गदर्शनाचा अभाव असतो. ही गरज ओळखून प्रवरा स्पर्धा परीक्षा केंद्राची उभारणी करण्यात आली. या केंद्रातून अनेक विद्यार्थी पोलीस विभाग, सैन्यदल, महसूल विभाग, बँकिंग क्षेत्र तसेच विविध शासकीय सेवांमध्ये निवडले गेले आहेत.ग्रामीण युवकांना स्पर्धा परीक्षांची भीती वाटू नये, त्यांना योग्य मार्गदर्शन, अभ्यास साहित्य आणि अनुभवी शिक्षकांचे सहकार्य मिळावे, यासाठी सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. परिणामी अनेक कुटुंबांमध्ये सरकारी सेवेची परंपरा निर्माण होत आहे.

संस्कार आणि परंपरांचे संवर्धन

आधुनिक शिक्षणासोबत भारतीय संस्कृती, अध्यात्म आणि सामाजिक मूल्यांचे जतन होणे तितकेच आवश्यक आहे. याच विचारातून प्रवरा परिवारात आषाढवारी सारखा उपक्रम राबविला जातो. विद्यार्थ्यांना संत परंपरा, वारकरी संप्रदाय, समाजसेवा, सामूहिकता आणि नैतिक मूल्यांची ओळख करून दिली जाते.

आजच्या तंत्रज्ञानप्रधान युगात विद्यार्थ्यांनी आपल्या संस्कृतीशी जोडलेले राहावे, हा या उपक्रमामागील मुख्य हेतू आहे. त्यामुळे शिक्षणाबरोबरच सुसंस्कृत नागरिक घडविण्याचे कार्य घडत आहे.

कौशल्याधारित शिक्षणातून रोजगारक्षम युवक
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या पार्श्वभूमीवर घडवण्याचे काम त्यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहे.

कौशल्याधारित शिक्षणाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान न देता प्रत्यक्ष काम करण्याची क्षमता विकसित व्हावी यासाठी विविध कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्याला त्यांचे विशेष प्राधान्य आहे.

 

संगणक तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता, आधुनिक उद्योग व्यवस्थापन, कृषी प्रक्रिया उद्योग, आरोग्य सेवा, डिजिटल कौशल्ये, संवाद कौशल्ये अशा अनेक क्षेत्रांमध्ये विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले जाते. त्यामुळे ग्रामीण युवक जागतिक स्पर्धेत सक्षमपणे उभे राहत आहेत.

 

भारताला आत्मनिर्भर बनविण्याच्या राष्ट्रीय उद्दिष्टाशी सुसंगत असे तंत्रशिक्षण देण्यावर विशेष भर प्रवरा शैक्षणिक संकुलात ना.विखे पाटील यांचा विशेष पुढाकार आहे.

 

अभियांत्रिकी, पॉलिटेक्निक, आयटीआय आणि विविध तांत्रिक अभ्यासक्रमांमधून विद्यार्थ्यांना उद्योग क्षेत्राच्या गरजेनुसार प्रशिक्षण दिले जाते.

यामुळे रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होत असून अनेक विद्यार्थी स्वतःचे उद्योग सुरू करण्यासाठी पुढे येत आहेत. शिक्षण आणि उद्योग यांच्यातील दरी कमी करण्यासाठी संस्थेने सातत्याने प्रयत्न केले आहेत.

*बिल्डिंग प्रवरा* *उद्योजकतेची* *प्रयोगशाळा*

“नोकरी शोधणारे नव्हे, तर नोकरी निर्माण करणारे युवक घडविणे” हा डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांचा दूरदृष्टीचा विचार आहे. याच संकल्पनेतून “बिल्डिंग प्रवरा” हा अभिनव उपक्रम सुरू करण्यात आला.

विद्यार्थी एक्सपोच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी विविध उत्पादनांचे, सेवांचे आणि नवकल्पनांचे स्टॉल उभारले. या स्टॉल्सच्या माध्यमातून दीड कोटी रुपयांपेक्षा अधिक उलाढाल झाली. विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष व्यवसाय नियोजन, ग्राहक व्यवस्थापन, विपणन, वित्तीय नियोजन आणि नेतृत्वाचे धडे अनुभवातून शिकले.
हा उपक्रम ग्रामीण विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकतेची मानसिकता निर्माण करणारा ठरला आहे

*प्लेसमेंट आणि माजी विद्यार्थ्यांचे बळ*

प्रवरा संस्थेची मजबूत प्लेसमेंट व्यवस्था आज अनेक विद्यार्थ्यांच्या यशाचा पाया ठरला. देशातील आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील नामांकित कंपन्यांमध्ये विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहेत.
याशिवाय संस्थेचे माजी विद्यार्थी विविध क्षेत्रांत उच्च पदांवर कार्यरत असून ते नवीन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन, प्रशिक्षण आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देतात. त्यामुळे ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी जागतिक स्तरावरील दारे खुली होत आहेत.

*कृषी शिक्षणाला प्रत्यक्ष कृतीची जोड*

कृषिप्रधान भागातील विद्यार्थ्यांसाठी कृषी शिक्षण हे केवळ वर्गखोल्यांपुरते मर्यादित नसावे, या विचारातून प्रत्यक्ष शेतात प्रशिक्षणाची संकल्पना राबविण्यात आली आहे.
विद्यार्थ्यांना आधुनिक शेती, जलव्यवस्थापन, पीक संरक्षण, कृषी उद्योजकता, सेंद्रिय शेती आणि कृषी तंत्रज्ञान यांचे प्रत्यक्ष प्रशिक्षण दिले जाते. शेतकऱ्यांपर्यंत नवीन संशोधन पोहोचविण्याचे कार्यही संस्थेमार्फत सातत्याने केले जाते.
“बांधावर शिक्षण आणि शेतकऱ्यांच्या सेवेत संशोधन” ही संकल्पना ग्रामीण विकासासाठी महत्त्वाची ठरत आहे.

शिष्यवृत्तींच्या माध्यमातून शिक्षणाची संधी

आर्थिक अडचणीमुळे कोणत्याही विद्यार्थ्याचे शिक्षण थांबू नये, यासाठी विविध शिष्यवृत्ती योजना, आर्थिक सहाय्य आणि फी सवलती उपलब्ध करून दिल्या जातात.
ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थ्यांना या योजनांमुळे उच्च शिक्षणाची संधी मिळाली आहे. शिक्षण हे आर्थिक परिस्थितीवर नव्हे तर गुणवत्तेवर आधारित असावे, या तत्त्वाची जपणूक करण्यात येत आहे.
विकासाच्या केंद्रस्थानी माणूस
डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या कार्याचा केंद्रबिंदू हा नेहमीच सामान्य माणूस राहिला आहे. शिक्षण, कौशल्य, रोजगार, संस्कार, कृषी आणि सामाजिक विकास या सर्व क्षेत्रांचा समन्वय साधत त्यांनी ग्रामीण भागाच्या प्रगतीसाठी सातत्याने योगदान दिले आहे.
आज प्रवरा परिवार हा केवळ शैक्षणिक समूह नसून ग्रामीण परिवर्तनाची चळवळ बनला आहे. ज्ञान, संस्कार, कौशल्य आणि समाजसेवा यांच्या आधारावर सक्षम भारत घडविण्याचे कार्य या संस्थेमार्फत सुरू आहे.
नामदार डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या कार्याला मनःपूर्वक शुभेच्छा देताना, त्यांनी सुरू केलेली शिक्षण आणि विकासाची ही वाटचाल अधिक व्यापक आणि यशस्वी होवो, हीच शुभेच्छा.

यमन पुलाटे
प्रसिध्दी प्रमुख
प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्था, लोणी

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *