क्रांतीचे रणशिंग फुंकणारे थोर साहित्यिक आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०६ व्या जयंतीनिमित्त संगमनेर तालुक्यातील निळवंडे येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले.
यावेळी बाळासाहेब थोरात यांनी अण्णाभाऊंच्या कार्याचे स्मरण करत म्हणाले की, “अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या लेखणीतून आणि डफावरच्या थापेने सामान्यांच्या व्यथा मांडल्या. संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील त्यांचे योगदान अतुलनीय असून, त्यांचे विचार आजही समाजाला दिशा देणारे आहेत.
या सोहळ्याला निळवंडे गावचे माजी सरपंच रायभान नारायण पवार, ग्रामपंचायत सदस्य विकास चांगदेव पवार, ग्रा.पं सदस्य प्रभाकर (अंकल) पवार , साहेबराव आव्हाड, बाळासाहेब आव्हाड, नामदेव आव्हाड, सतीश आव्हाड, अविनाश आव्हाड, योगेश आव्हाड, शंकर आव्हाड आणि सचिन आव्हाड यांच्यासह मोठया संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.