{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":["local"],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{"addons":1},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":true,"containsFTESticker":false}

औरंगाबाद l झुंजार न्यूज

औरंगाबाद जिल्हा सहकारी दुध संघाचे माजी चेअरमन तथा महानंद दुध महासंघाचे माजी संचालक हरीभाऊ बागडे (नाना) यांची राजस्थानच्या राज्यपाल पदी निवड झाल्याबद्दल औरंगाबाद जिल्हा सहकारी दुध संघाच्या वतीने नागरी सत्कार महानंद दुध महासंघाचे माजी अध्यक्ष तथा राजहंस सहकारी दुध संघाचे चेअरमन रणजितसिंह देशमुख यांच्या हस्ते करण्यात आला . 

यावेळी रणजितसिंह देशमुख म्हणाले की , डोक्यावर गांधी टोपी आणि अगदी साधी राहणीमान असलेले हरिभाऊ बागडे औरंगाबादचे नेते आहे. मातीतून कष्टाने वर आलेले नेते म्हणून हरिभाऊ बागडे यांची ओळख आहे. पेपर टाकण्याचं काम केलेले हरिभाऊ बागडे आता राज्यस्थानचे राज्यपाल झाले . गेल्या 65 वर्षांच्या राजकिय खडतर प्रवासातून नाना हे आमदार , मंत्री झाले मात्र त्यांचे साधी राहणी , सरळ स्वभाव ते सर्वांना आप – आपलेसे झाले .आता ते थेट राज्यपाल झाले . महानंदा मध्ये काम करतांना त्यांचे सातत्याने मार्गदर्शन लाभले असे सांगत देशमुखांनी नानांच्या अनेक आठवणींना उजाळा दिला तर नाना हे चालता – बोलता कार्यकर्त्यांचे विदयापीठ असून कार्यकर्ता जमावण्याची त्यांची हातोटी असल्याचे देशमुख म्हणाले .

यावेळी महानंद दुध महासंघाचे माजी उपाध्यक्ष डि.के. पवार , औरंगाबाद जिल्हा सहकारी दुध संघाचे  चेअरमन नदंलाल काळे , औरंगाबाद जिल्हा सहकारी दुध संघाचे व्हा चेअरमन दिलीपराव निर्फळ ,औरंगाबाद जिल्हा सहकारी दुध संघाचे कार्यकारी संचालक पहाडिया, धोत्रे , कैलास देशमुख आदीसह अहमदनगर , औरंगाबाद जिल्ह्यातील विविध संस्थाचे चेअरमन-व्हा चेअरमन तसेच जिल्हा सहकारी दुध संघाचे सर्व दुध उत्पादक शेतकरी व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *