संगमनेर l झुंजार न्यूज
संपूर्ण देशासाठी सहकाराचे आदर्श मॉडेल ठरलेल्या अमृत उद्योग समूहामधील ( राजहंस ) संगमनेर तालुका सहकारी दूध उत्पादक संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात व मा.आ.डॉ.सुधीर तांबे यांच्या उपस्थितीमध्ये व चेअरमन रणजितसिंह देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली शनिवार दिनांक 31 ऑगस्ट 2024 सकाळी 11 वाजता कारखाना कार्यस्थळावरील कारखान्याच्या नवीन प्रशासकीय इमारती समोरील अमृतेश्वर मंदिराच्या प्रांगणात होणार असल्याची माहिती व्हा चेअरमन राजेंद्र चकोर व कार्यकारी संचालक डॉ सुजित खिलारी यांनी दिली .

स्वातंत्र्यसेनानी सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या आदर्श विचारांवर संगमनेर मधील अमृत उद्योग समूहातील विविध सहकारी संस्थांचे कामकाज हे देशासाठी उत्तम मॉडेल ठरले आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य तथा पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली या सर्व सहकारी संस्थांमधून तालुक्याच्या ग्रामीण विकासासह शेतकरी, उत्पादक ,नागरिक ,महिला, व्यापारी, कामगार या सर्वांचा विकास साधला जात असून या सहकारी संस्थांमुळे तालुक्याची अर्थव्यवस्था मजबूत झाली आहे.

या आदर्शवत राजहंस दूध उत्पादक सहकारी संस्थांच्या वार्षिक सर्वसाधारण सभा 31 ऑगस्ट 2024 रोजी 11 वाजता कारखान्याच्या नवीन प्रशासकीय इमारती समोरील अमृतेश्वर मंदिराजवळील प्रांगणात काँग्रेस पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात,मा.आ.डॉ.सुधीर तांबे ,आमदार सत्यजित तांबे, युवक काँग्रेसचे अध्यक्ष डॉ. जयश्रीताई थोरात, ॲड.माधवराव कानवडे, बाजीराव पा .खेमनर , सौ.दुर्गाताई तांबे, इंद्रजीत थोरात यांच्यासह अमृत उद्योग समूहातील सर्व संस्थांचे पदाधिकारी व तालुक्यातील विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

तरी या वार्षिक सर्वसाधारण सभांसाठी सभासद व दूध उत्पादक यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन दूध संघाचे व्हा.चेअरमन राजेंद्र चकोर , लक्ष्मणराव कुटे , रामनाथ राहाणे , विलासराव वर्षे , भास्करराव सिनारे , संतोष मांडेकर , विलास कवडे , बबन कुन्हाडे , बादशहा वाळुंज , संजय पोकळे , विक्रमराजे थोरात , विष्णू ढोले , तुकाराम दातीर , रविंद्र रोहम , सौ प्रतिभा जोंधळे , सौ. मंदा नवले , भारत मुंगसे , प्रमोद पावसे , कार्यकारी संचालक डॉ. सुजित खिलारी यांनी केले आहे.

