श्रीरामपूर l झुंजार न्यूज
गेल्या १५ वर्षाच्यापासून भाजपा व रिपाई पक्षाचे मैत्रीपूर्ण संबंध असताना सुध्दा राज्यात रिपाई च्या कार्यकर्त्यांना मित्र पक्षाच्य पदाधिकाऱ्यांकडून सन्मान पुर्वक न्याय न मिळाल्याने समाज्यासह कार्यकर्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी असून होणाऱ्या विधानसभा निवडणुकीमधून श्रीरामपूरची जागा न दिल्यास व समाज्याला व पक्षाला लोकसभा निवडणुकीप्रमाणे ठेंगा दाखविण्याचा प्रयत्न झाल्यास जिल्हयातून १२/ o चित्र निर्माण करुन भाजपाला ठेंगा दाखवू असे रिपाई प्रदेश उपाध्यक्ष विजयराव वाकचौरे यांनी मित्रपक्षांना ठणकावले .

श्रीरामपूर येथील शासकिय विश्रामगृहात नुकत्याचं झालेल्या रिपाई जिल्हा संवाद बैठकीतून विजयराव वाकचौरे बोलत होते . बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हा संपर्क प्रमुख श्रीकांत भालेराव हे होते तर , जेष्ठ नेते राजाभाऊ कापसे , उत्तर जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात , राज्य सचिव दिपक गायकवाड , जिल्हा विभागीय प्रमुख भिमा बागुल , सुभाष त्रिभूवन , आशिष शेळके , कैलास कासार यांच्यासह सर्व तालुकाध्यक्ष , पदाधिकारी , कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते .

यावेळी विजयराव वाकचौरे म्हणाले की , केद्रींय मंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखालील रिपब्लिकन पक्ष देशाच्या काना कोपऱ्यात पोहचला असून सर्व समाज्यातील लोकांचे आठवले यांच्यावर विशेष जिव्हाळा व प्रेम आहे राज्यातचं नव्हेतर देशातील प्रत्येक गावा – गावात रिपाईचा कार्यकर्ता दिसत आहे . २००९ पासून रामदास आठवले यांनी भाजपाशी मैत्री संबंध निर्माण केल्याने गेल्या १५ वर्षात कार्यकर्त्यांनी तन – मनानी प्रामाणिक व निष्ठेने मित्रत्व जपले मात्र भाजपाच्या नेत्यासह कुठल्याही कार्यकर्त्यांनी आता पर्यंत रिपाई कार्यकर्त्याला विश्वासात घेवून सत्तेच्या प्रवाह आणले नाही . किती दिवस यांची हुज्यागिरी करायची आता मत प्रवाह दलित समाज्यात पसरला गेल्याने भाजपासह मित्र पक्षावर नाराजी निर्माण झाल्याने हे सर्व एका माळेचे मणी आहे यांना दलित समाज्यातील माणसे सत्तेत चालत नाही चालतात फक्त मताकरिता असे परखड मत व्यक्त करत वाकचौरे म्हणाले की , लोकसभा निवडणुकीमध्ये यांनी वर वर माया , खाली निजग बया ! या म्हणीनुसार रिपाई पक्षाला अंधारात ठेवून शिर्डीची जागा रामदास आठवले दिली नाही त्याचा परिणाम पराभवात दिसून आला आता पुन्हा तीचं पुनरावृत्ती केल्यास श्रीरामपूर विधानसभेची जागा रिपाई न दिल्यास जिल्हयात १२ /o परिणाम दाखवू हे निश्चित असे वाकचौरे शेवटी म्हणाले .

चौकट
आता रिपब्लिकन पक्षाला निवडणुक आयोगाची मान्यता मिळाली असून ऊस धारक शेतकरी हे पक्षाला चिन्ह मिळाल्याने आता जिल्हयातचं नव्हे तर राज्यात या चिन्हाने पक्षाला मोठा फायदा होणार आहे ऊस धारक शेतकरी हे चिन्ह घराघरात पोहचलेले आहे तर श्रीरामपूर च्या जागेकरिता लवकरचं पालकमंत्र्यांना भेटू असे वाकचौरे यांनी सांगितले .

