आश्वी : प्रतिनिधी
केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री तथा रिपब्लिकन पक्षाचे सर्वेसर्वा ना . रामदास आठवले हे सोमवार दि 2 सष्टेबर 2024 रोजी विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने अहमदनगर जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांच्या स्वागताकरिता शिर्डी विमानतळावर कार्यकर्त्यांनी मोठया संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन संगमनेर तालुकाध्यक्ष आशिष शेळके यांनी दिली .

केंद्रीय मंत्री रामदास आठवले हे सोमवारी शिर्डी येथील विमानतळावर सकाळी 11 वाजता येणार असून 12 वाजता शिर्डी येथील शासकिय विश्रामगृह येथे पत्रकार परिषद होणार आहे त्यानंतर ते श्रीरामपूर येथील रिपाईचे विभागीय प्रमुख भिमा बागुल यांच्या निवासस्थानी भेट देवून नेवासामार्गे नगर येथील संविधान सोहळ्यास उपस्थित रहाणार आहे . तसेच सिध्दार्थ नगर मधील पचशिल विद्यालय येथे त्यांचा भव्य नागरी सत्कार. होणार असून निलक्रांती चौक सुशोभिकरण भूमीपूजन त्यांच्या हस्ते होणार आहे तर कोठी स्टेशन रोड येथे ख्रिस्ती समाजाच्या वतीने निवेदन व सत्कार तसेच अजय साळवे व सुरेश बनसोडे यांनी आयोजित केलेल्या सहकार सभागृह स्टेशन रोड येथे संविधान मेळावा संप्रन्न होणार असून प्रदेशाध्यक्ष राजा सरवदे , आ संग्राम जगताप , प्रद श उपाध्यक्ष विजयराव वाकचौरे , जिल्हा संपर्क प्रमुख श्रीकांत भालेराव , बाळासाहेब गायकवाड , दिपकराव गायकवाड , जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात , भिमा बागुल , पप्पू बनसोडे आदीसह जिल्हा व जिल्हा बाहेरुन पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत .

तरी रामदास आठवले हे मंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच जिल्हा दौऱ्यावर येत असल्याने शिर्डी येथील विमानतळावर कार्यकर्त्यांनी त्यांच्या स्वागतासाठी मोठया संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन तालुकाध्यक्ष आशिष शेळके, कार्याध्यक्ष विजय खरात, शहराध्यक्ष कैलास कासार, युवक अध्यक्ष योगेश मंतोडे, जिल्हा उपाध्यक्ष विजय अडांगळे, शरद जमदाडे, आत्माराम अडांगळे, प्रकाश वाघमारे, शरद तपासे, उपाध्यक्ष बाळासाहेब कदम, तालुका सचिव जनार्दन साळवे, महिला तालुकाध्यक्ष रुपाली सोनवणे, गौतम वर्पे, रमेश भोसले,संपत भोसले, सागर शिंदे सिद्धार्थ खरात, नानाभाऊ कदम, दीपक खरात, राजू वाघमारे, स्वप्निल कदम, योहान मिसाळ, दीपक खरात, शशी रोकडे, विकास गायकवाड, नाना जगताप, गोविंद सोनवणे, अविनाश सोनवणे, अनिकेत खरात, दीपक अडांगळे आदींनी केले आहे

