शिर्डी l झुंजार न्यूज
केंद्रीय मंत्रीमंडळात तिसऱ्यांदा सामाजिक न्याय मंत्री म्हणून ना . रामदास आठवले यांची निवड झाल्यानंतर प्रथमचं नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता आठवले यांचे शिर्डी विमानतळावर भर पावसात हजारों कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत जंगी स्वागत झाले .

केंद्रीय मंत्री रामदास आठवले हे नगर येथील संविधान सोहळ्याच्या कार्यक्रमाला शिर्डी मार्गे जाणार असल्याचे समजता सकाळ पासूनचं वरुणराजा बरसत असताना सुध्दा शिर्डी विमानतळावर शिर्डी लोकसभा मतदारसंघातील हजारों कार्यकर्ते रामदास आठवले यांच्या स्वागतासाठी उपस्थित राहिले . यावेळी रामदास आठवले यांनी सुध्दा प्रत्येक कार्यकर्त्यांची अस्तेने विचारपूस केल्याने कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य दिसून आले .

यावेळी रिपाई प्रदेश उपाध्यक्ष विजयराव वाकचौरे , जिल्हा संपर्क प्रमुख श्रीकांत भालेराव , उत्तर महाराष्ट अध्यक्ष राजाभाऊ कापसे , बाळासाहेब गायकवाड , दिपकराव गायकवाड , जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात , युवा जिल्हाध्यक्ष पप्पू बनसोडे , धनजंय निकाळे , संगमनेर तालुकाध्यक्ष आशिष शेळके , कैलास कासार , रमेश शिरकांडे , विलास साळवे , अनिल नन्नवरे , विकी कापसे , विशाल कोळगे , नानाभाऊ त्रिभूवन , गणेश साळवे , सौ वैशाली सोनवणे , सौ स्नेहल सांगळे आदीसह मोठया संख्येने उपस्थित होते .
Post Views: 1,116
