शिर्डी l झुंजार न्यूज
माहिती तंत्रज्ञानाच्या काळामध्ये अनेक माध्यमे आली आहे त्यामुळे पत्रकारितेचे पूर्वीचे स्वरूप डिजिटल पत्रकारिता आली आहे. इलेक्ट्रॉनिक माध्यमांबरोबर सोशल माध्यमाचाही परिणाम होत असला तरी . घडामोडी थोडक्यात दाखविल्या जातात मात्र एखाद्या घटनेचे विश्लेषण ,बारकावे हे केवळ वृत्तपत्रांमधूनच देऊ शकते. त्या मुळेच वृत्तपत्र अर्थात प्रिंट मीडियामाध्यम शाश्वत असल्याचा विश्वास काँग्रेस विधि मंडळ पक्षनेते आणि माझे महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला .

व्हाईस ऑफ मीडिया या आंतरराष्ट्रीय स्तरावरील संघटनेचे शिर्डीत राज्यस्तरीय दोन दिवसीय शिखर अधिवेशन पारपडले त्या अधिवेशनातील दुसऱ्या दिवसाच्या सत्रात पत्रकारांना मार्गदर्शन करताना आ थोरात बोलत होते यावेळी व्यासपीठावर हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील, शेतकरी नेते रविकांत तुपकर गोदावरी उद्योग समूहाच्या अध्यक्षा राजश्री पाटील
ज्येष्ठ संपादक प्रकाश पोहरे व्हाईस ऑफ मीडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे , प्रदेशाध्यक्ष अनिल मस्के अ नगर जिल्हाध्यक्ष गोरक्षनाथ मदने, कार्याध्यक्ष योगेंद्र दोरकर , राज्य उपाध्यक्ष अजित कुंकूलोळ, नाशिक जिल्हाध्यक्ष कुमार कडलग अ नगर जिल्हाध्यक्ष गोरक्षनाथ मदने , कार्याध्यक्ष हरीश दिमोटे , उपाध्यक्ष बाळासाहेब गडाख , सचिव अमोल मतकर , खजिनदार गोरक्ष नेहे , कार्यवाहक भारत रेघाटे , तालुका अध्यक्ष बाबासाहेब कडू , सचिव सचिन जंत्रे , अर्जुन आरगडे , राजेश गायकवाड , सिध्दार्थ मेहेरखांब , अशोक दुशिंग , केशव कडलग , रेश्मा मारवाडी आदिसह व्हाईस ऑफ मीडियाचे सर्व विभागाचे विभागीय अध्यक्ष राज्यातील प्रत्येक जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष तालुकाध्यक्ष मोठ्या संख्येने उपस्थित होते
आदी मान्यवर उपस्थित होते

आ थोरात म्हणाले की मराठी पत्रका रितेचे जनक बाळशास्त्री जांभेकर यांनी मराठी पत्रकारितेची सुरुवात केली. त्या नंतरच खऱ्या अर्थाने मराठी मध्ये वृत्तपत्रे सुरू झाली एखादा साधा पेपरही आज चांगला विषय देऊ शकतो. हे नक्कीच कौतुकास्पद आहे.पूर्वीच्या वृत्तपत्रांतील अनेक अग्रलेख हे दिशा देणारे होते.त्या अग्रलेखाची परंपरा पत्रकारांनी जपली पाहिजे. परंतु अग्रलेख काळाच्या ओघात बदलत चालले आहे.. इलेक्ट्रॉनिक माध्य मातील पत्रकारितेचा स्तर बदलला आहे असं म्हटल तरी वावगे ठरणार नाही. तर सध्याच्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगामध्ये माध्यमांमध्ये सुद्धा बदल होत असल्याचे स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केले

एकीकडे लोकशाही आणि संविधाना मुळे पत्रकारिता टिकून आहे तरदुसरीकडे हुकूमशाही करून पत्रकारितेची मुस्कट दाबी सुरू आहे.अशा मुस्कटदाबीलाबळी न पडता पत्रकारांनी लोकशाही व राज्य घटना टिकली पाहिजे यासाठीपत्रकारांनी हुकूमशाहीला साथ ना देता राज्यघटनेच्या मूल्याचे पालन करावे असा सल्ला त्यांनी पत्रकारांना देत तुम्हीच खरे समाजमनाचा आरसा आहे म्हणून व्हॉइस ऑफमीडिया च्या माध्यमातून राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे यांनी राज्यातील सर्व पत्रकारांना एकत्र आणून त्यांच्यात सांगड घालण्याचे काम केली असल्याचे गौरवोद्गार आमदार थोरात यांनी काढले

