शिर्डी l झुंजार न्यूज
2024 च्या लोकसभेकरिता दोन जागा मागितल्या होत्या . मात्र महायुतीच्या कलगीतुरात आम्हाला आश्वासनावर थांबविले कारण आमच्यात मान , अपमान पचविण्याची सवय असल्याने आम्ही थांबलो मात्र आता विधानसभेत हे घडणार नाही श्रीरामपूरसह 18 जागा रिपाई पक्षाला दया अन्यथा 2009 प्रमाणे रिपाई पक्ष स्वतंत्र उमेदवार देवून रिडालोस प्रयोग करेल असा इशारा झुंजार न्यूजशी बोलताना केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी महायुतीला दिला .

केंद्रीय मंत्री रामदास आठवले हे नगर जिल्हयाच्या दौऱ्याकरिता शिर्डी विमानतळावर आले असता श्रीरामपूर विधानसभा जागा व भाजपाकडून कुठल्याप्रकारे सहकार्यांना भावना नसल्याची कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या भावनेतून आठवले यांनी पत्रकाराशी संवाद साधला . यावेळी विजयराव वाकचौरे , श्रीकांत भालेराव , राजाभाऊ कापसे , बाळासाहेब गायकवाड , दिपक गायकवाड , सुरेंद्र थोरात , पप्पू बनसोडे , गणेश साळवे , आशिष शेळके , कैलास कासार आदीसह पदाधिकारी , कार्यकर्ते उपस्थित होते .

यावेळी रामदास आठवले पुढे म्हणाले कि , मला केंद्रीय मंत्रिपद दिले मात्र राज्यातील महायुतीच्या सत्तेत रिपब्लिकन पक्षाला सत्तेत सहभागी केले गेले नाही पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना विश्वासात घेतले जात नाही. नगर जिल्हयात देखील कार्यकर्त्यांना सन्मान मिळत नसल्याची खंत व्यक्त करत ना. रामदास आठवले म्हणाले की , नगर जिल्हयातील भाजपा नेत्यांशी आमचे चांगले संबंध आहे मात्र आमच्या कार्यकर्त्यांना ते सत्तेच्या प्रवाहात सामिल करत नाही कार्यकर्ता हा पक्षाचा कणा आहे तो पक्षाचं आत्मविश्वासाने काम करत असतो . त्यालाही सत्तेत सहभागी होण्याची भावना असते तेव्हा मला सुध्दा कार्यकर्त्यांच्या भावनेचा विचार करावा लागतो . हे लक्ष्यात ठेवा मान आणि अपमान पचवण्याची सवय आहे त्यामुळेचं आम्ही महायुती बरोबर आहोत.

2012 पासून रिपाई भाजप-शिवसेना युतीबरोबर असून केंद्रात मला तिसऱ्यांदा मंत्रिपद मिळाले, मात्र राज्यातील सत्तेत स्थान मिळाले नाही. राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर रिपाइंला प्रतिनिधित्व दिले जाईल, असे वेळोवेळी सांगितले मात्र रिपाईला मंत्रीपद दयावे लागेल या धास्तीने विस्तारचं होत नसल्याची शंका आठवले यांनी मिश्कीलपणे म्हटले .

कार्यकर्त्यांच्या तक्रारीवरुन स्थानिक पातळीवर कोणत्याही योजनेच्या कार्यक्रमास पदाधिकारी व कार्यकर्त्यांना बोलावले जात नाही हा एक प्रकारे अपमानच आहे. तरीही आगामी काळात महायुतीमध्ये राहणार असल्याचा निर्धार आठवले यांनी व्यक्त केला. मात्र श्रीरामपूरसह राज्यात 18 जागा रिपाईला हव्यात याकरिता भाजपा वरिष्ठांशी चर्चा करून प्रदेशाध्यक्षांना कळविले आहे .

लोकसभेकरिता महायुतीकडे दोन जागांची मागणी केली होती. शिर्डीतून मी इच्छुक होतो मात्र आमचा विचार झाला नाही याबाबत मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा केली त्या चर्चेतून कळाले की राज्यातूनच तुमचे नावचं यादीत नव्हते . आता विधानसभेत असे करू नका अन्यथा राज्यात रिपाई आम्ही स्वतंत्र उमेदवार उभे करुन 2009 चा रिडोल्यस प्रयोग करु ! रिडालोस प्रयोगातून आमचे दहा उमेदवार हे तीन अंकाने पडले तर श्रीरामपूरमधून राजाभाऊ कापसे यांनी 22 हजार मते घेतल्याचे आजही आठवते .
ना .रामदास आठवले ( केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री )
Post Views: 740

