{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":["local"],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{"addons":1},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":true,"containsFTESticker":false}

शिर्डी l झुंजार न्यूज

 

 

राजकारणी फक्त पत्रकारांना घाबरत असतात. समाजाचे प्रश्न फ्रंट वर आणतात. निगेटिव्ह बातमी घोटाळा, अटक, आत्महत्या हे कायमचे विषय आहेत. आज हेच विषय बातमीत दिसत असतात जगात केवळ वाईटच घडत आहे का? चांगले नाही का ? समाजाचे वास्तव आपण स्वीकारले पाहिजे या माध्यमातून आपल्याला बदल करता येईल. चांगले काय करता येईल. असे मत राजश्री पाटील यांनी व्यक्त केले.

 

 

 

शिर्डी येथे व्हाईस ऑफ मीडिया आयोजित राज्यस्तरीय शिखर अधिवेशन प्रसंगी श्रीमती पाटील बोलत होत्या.

 

 

 

 

राजश्री पाटील पुढे म्हणाल्या की, आपण काय दिले ? आपण कधी द्यायला शिकणार आपण दाता कधी होणार? . जबाबदारीतून देणे पार पाडले पाहिजे. सकारात्मक पत्रकारिता पुढे आली तरच प्रश्न मिटतील. केवळ बातमी चांगले परिणाम बातमी करू शकते .एक बातमी काही करू शकते ! लेखणीत सामर्थ्य आहे. ती एक. मोठे दुधारी शस्त्र आहे. या शस्त्राची ताकद पत्रकाराला ओळखता आली पाहिजे. समाजातील विघातक बदल टिपले पाहिजे. संविधान हे मातृत्व आहे. संस्काराच्या मुशीतूनच सजग नागरिक निर्माण होतीलः संविधानातही ताकद आहे ते चिल्लर नाही.संविधानाने शाश्वत मूल्ये दिली. येथील प्रत्येक नागरिक संविधानाचा पाईक असल्याचे पाटील म्हणाल्या.

 

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *