इंदिरा महोत्सवात 20,000 महिलांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रम

संगमनेर l झुंजार न्यूज

 

 

 

 

बचत गटातील महिलांना रोजगार व स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध  करून देऊन त्या कुटुंबाची अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी हा प्रयत्न आहे. इंदिरा महोत्सवातून अनेक महिलांना रोजगार व स्वयंरोजगारासाठी मोठे व्यासपीठ निर्माण झाले असून बचत गटाच्या उत्पादित मालांच्या मार्केटिंग साठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर केल्यास जगाच्या पाठीवर पोहोचता येईल असे सांगताना हा महोत्सव रोजगार व स्वयंरोजगारासाठी मानबिंदू ठरेल असे प्रतिपादन विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.

 

 

इंदिरा महोत्सवात दुसऱ्या दिवशी झालेल्या वीस हजार महिलांच्या मेळाव्यात ते बोलत होते यावेळी व्यासपीठावर खासदार डॉ. शोभाताई बच्छाव, खासदार भाऊसाहेब वाकचौरे, जिल्हाध्यक्ष जयंतराव वाघ, कॅन्सरतज्ञ डॉ.जयश्रीताई थोरात, सौ दुर्गाताई तांबे, सौ प्रभावती ताई घोगरे, पौर्णिमाताई शिरसकर, केशवराव कांबळे, इंद्रजीत भाऊ थोरात,सह्याद्री उद्योग समूहाचे विलास शिंदे, सत्यजित हंगे, रणजितसिंह देशमुख, संपतराव मस्के घनश्याम शेलार, सौ शरयूताई देशमुख, जगन्नाथ घुगरकर अनिल शिंदे आदींसह तालुक्यातील सर्व प्रमुख महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.

 

 

यावेळी बोलताना आमदार थोरात म्हणाले की, राजीव गांधी यांनी महिला आरक्षण विधेयक आनले त्यामधून  33 टक्के आरक्षण महिलांना मिळाले .महाराष्ट्रामध्ये काँग्रेसने महिलांना 50 टक्के आरक्षण दिले. त्यामुळे खऱ्या अर्थाने महिला सक्षमीकरण झाले. सर्व शासकीय योजनांचा महिलांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा .उंबरठा ओलांडून जगामध्ये येण्याची तयारी ठेवा. तुमच्या उद्योग व्यवसायाला एकविरा फाउंडेशनच्या माध्यमातून नक्कीच मदत केली जाईल. या महोत्सवामध्ये  दोन दिवसांमध्ये सुमारे 35 हजार महिला सहभागी झाल्या आहेत. तालुक्यात बचत गटांचे मोठे जाळे असून बचत गटातील महिलांनी काही उत्पादने केल्यास चांगले मार्केटिंग केले तर त्या कुटुंबाला मोठा फायदा होईल असा विश्वास व्यक्त करताना गरीब महिलांच्या जीवनात सुख यावे यासाठी सर्वजण काम करत असल्याचे ते म्हणाले

 

 

तर खासदार डॉ.शोभाताई बच्छाव म्हणाल्या की, संगमनेर तालुक्यातील महिला बचत गटांनी सेंद्रिय पद्धतीने शेती उत्पादनांना प्राधान्य द्यावे. हायब्रीड मुळे आता आजार वाढले असून सेंद्रिय शेती उत्पादनांमधून मोठी संधी असल्याचेही त्या म्हणाल्या.

 

तर प्रभावती ताई घोगरे म्हणाले की, महिलांनी अंधश्रद्धेवर विश्वास ठेवून उपवास तपास करण्यापेक्षा उद्योग व्यवसायाकडे वळले पाहिजे .शेती व्यवसायात महिलांना मोठी रोजगाराची संधी असल्याची त्या म्हणाल्या.

 

 यावेळी सह्याद्री ऍग्रो चे विलास शिंदे, टू ब्रदर चे सत्यजित हंगे, सौ दुर्गाताई तांबे, पौर्णिमा शिरसकर यांनीही मार्गदर्शन केले.

 

तर डॉ जयश्रीताई थोरात म्हणाल्या की ,दोन दिवसीय महोत्सवात महिलांनी मोठा सहभाग घेतला असून या महिलांच्या रोजगारासाठी आपल्याला सतत पुढे काम करायचे आहे. तालुक्याच्या अर्थव्यवस्था भक्कम करण्यामध्ये महिलांचा मोठा वाटा असून आपण एकत्र येऊन जास्तीत जास्त रोजगाराच्या संधी निर्माण करू असेही त्या म्हणाल्या.

 

यावेळी अनेक पदाधिकारी महिला उपस्थित होत्या .

 

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आयोजित डॉ जयश्रीताई थोरात यांनी केले सूत्रसंचालन नामदेव कहांडळ यांनी केले तर सौ अर्चनाताई बालोडे यांनी आभार मानले

 

 


आम्ही संगमनेरी भारी- आमदार थोरात



चंदनपुरी येथील विद्यार्थिनींनी थायलंडमध्ये 51 देशांची स्पर्धा असल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळवला. संगमनेरच्या महिला मुलींनी देश पातळीवर मोठे नाव केले अनेक महिलांनी उद्योजकते मधून आपला नावलौकिक वाढवला आम्ही संगमनेरी भारी असल्याचेही ते यावेळी म्हणाले.

 

 

 

 


काँग्रेस नेते आमदार थोरात यांचा सर्व महिलांनी केला भव्य सत्कार

तालुक्याचे कुटुंबप्रमुख आमदार बाळासाहेब थोरात यांचे व्यासपीठावर आगमन होताच तालुक्यातील वीस हजार महिलांनी प्रचंड टाळ्यांच्या कडकडात टाक उभे राहून आमदार थोरात यांना अभिवादन करत उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार मिळाल्याबद्दल टाळ्यांच्या गजरात आमदार थोरात यांचा भव्यदिव्य अभूतपूर्व सत्कार केला…

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *