शिर्डी l झुंजार न्यूज
पत्रकारिता क्षेत्रामध्ये अनेक बदलाव झालेले दिसून येत असून डिजिटल लायझेशनमुळे ( मोजो ) मोबाईल जर्नालिस्टमुळे या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात बदल होत आहे. मोजो मुळे प्रत्येक व्यक्ती पत्रकार बनत आहे. या माध्यमाचा हवा तसा वापर तो करीत आहे. विशेषत्वाने यामध्ये बेजबाबदारपणा दिसून येत असून पत्रकाराने बेजबाबदारपणाने वागू नये असे मौलिक प्रतिपादन नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे यांनी केले.

शिर्डी येथे व्हाईस ऑफ मीडियाच्या राज्यस्तरीय अधिवेशन प्रसंगी पत्रकारांशी संवाद साधतांना तांबे बोलत होते.

यावेळी संस्थापक अध्यक्ष संदीप काळे, राष्ट्रीय महासचिव दिव्या भोसले, प्रदेशाध्यक्ष अनिल मस्के, कार्यवाहक तथा मुख्य संयोजक योगेंद्र दोरकर, राज्य सचिव गणेश शिंदे, जिल्हाध्यक्ष गोरक्षनाथ मदने, सह महाराष्ट्र आंध्र तेलंगना, आदि राज्यातील हजारो पत्रकार बांधव उपस्थीत होते.

तांबे म्हणाले की, पत्रकार हा लोकशाहीसाठी महत्त्वाचा आधारस्तंभ असून पत्रकारांनी सामाजिक भान जपले पाहिजे. संघटनेने अधिवेशनाच्या माध्यमातून पत्रकारांच्या उन्नतीसाठी प्रयत्न केले तर हे अधिवेशन सफल होईल असेही ते म्हणाले.

प्रास्ताविक योगेंद्र दोरकर यांनी केले, सूत्रसंचलन अनिल मस्के, आभार गोरक्षनाथ मदने यांनी मानले.

