{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":["local"],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{"addons":1},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":true,"containsFTESticker":false}

 

 

आश्वी l झुंजार न्यूज

 

राहुल गांधी यांनी अमेरिकेतील कार्यक्रमात केलेले आरक्षणासंबंधी विधानाचा पाथरे बु॥ मध्ये भाजपच्यावतीने तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. आरक्षणाला धक्का लावण्याचा कोणताही प्रयत्न आम्ही हाणून पाडू’, असा इशाराही यावेळी भाजपचे पाथरे बु॥ बुक अध्यक्ष सर्जेराव दौलत कदम यांनी प्रसिध्दी पत्रकाद्रारे दिला .

विदेशात जाऊन भारताची बदनामी करण्याचा उद्योग कॉग्रेस पक्षाचे नेते तथा लोकसभा विरोधी पक्ष नेते राहुल गांधी सातत्याने करत आहेत. विदेशात जाऊन मनाला येईल ते बरळणे, बेछूट आरोप करणे हे एका राष्ट्रीय पक्षाच्या लोकप्रतिनिधीला शोभत नाही. मात्र, त्यांच्या वक्तव्याने काँग्रेसचा आरक्षणविरोधी खरा चेहरा मात्र नक्कीचं उघड झाला आहे. भारत हा सामाजिकदृष्ट्या प्रगल्भ झाल्यानंतर देशातील आरक्षण संपविण्याचा विचार काँग्रेस पक्ष करेल, हे यावरुन सिध्द होत आहे .

राहुल गांधी यांनी अमेरिका दौऱ्याच्यादरम्यान वॉशिंग्टनमधील जॉर्जटाऊन विद्यापीठातील विद्यार्थी आणि शिक्षकांशी संवाद साधताना ‘आरक्षण संपवण्याचा मनसुबा बोलवून दाखविला . अमेरिकेत व्यक्त केलेल्या आरक्षणविरोधी भूमिकेचा पाथरे व परिसरातून दलित समाज्यासह विविध समाज्यात सुध्दा नाराजी व्यक्त होत असून भाजपच्यावतीने या विधानाचा पाथरे बु॥ येथील विविध समाज्यातील युवकांनी , महिलांनी राहुल गांधी व काँग्रेस पक्षाच्या विरोधात तीव्र निषेध व्यक्त करत घोषणा देण्यात आल्या .
राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *