अकोले l झुंजार न्यूज
जिल्हा बँकेच्या ७०० जागांसाठी भरतीची जाहीरात प्रसिध्द झाली असून जाहीरात प्रसिध्द होण्याच्या आधीच संचालक मंडळात खलबते होवून भरतीबाबत ‘कोणाला ही सांगू नका, ही कबूल’ घेण्यात आल्याची जोरदार चर्चा असून संचालक च्या मर्जीतीलचं लोकांना संधी देण्याचा घाट दिसत असल्याने आदीवाशी , ओबीसी समाज्याला या भरती प्रक्रियातून डावल्यास रिपब्लिकन पक्षाच्या वतीने आंदोलने करण्यात येवून न्यायालयाच्या दारात जावून असा इशारा प्रसिध्दी पत्रकाद्वारे रिपब्लिकन पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष विजयराव वाकचौरे यांनी दिला .

प्रसिध्दी पत्रकात वाकचौरे म्हणाले की , यापुर्वी २०१७ ला सुध्दा जिल्हा बँकेने आरक्षणाविना भरती प्रक्रिया केली मात्र ती वादग्रस्त ठरली होती. दरम्यान, यंदा तर बँकेची भरती प्रक्रिया ही संचालक मंडळाच्या निर्णयाच्या मंजूरीच्या आधीपासून गाजत आहे.

पाच ते सहा महिन्यांपूर्वी काही आमदारांनी जिल्हा बँकेच्या संगणक खरेदीसह, शाखांच्या दुरूस्तीवर केलेल्या वारेमाप खर्चासह बँकेच्या भरतीबाबत प्रश्नचिन्हे उपस्थित केले होते. त्यावेळी राजकीय हेतूने हे आरोप होत असल्याची भावना व्यक्त झाली . मात्र, त्यावेळी भरती व अन्य कारभाराबाबत झालेल्या आरोपांची चौकशी होताना दिसत आहे. बँकेच्या संचालक मंडळाने भरती प्रक्रिया राबवण्यासाठी नेमलेल्या संस्थेसह भरती प्रक्रिया राबवण्यासाठी टाकलेल्या अटीशर्ती वादाच्या भोवऱ्यात दिसत आहे. त्यामुळेचं भरती ऑनलाईन पध्दतीने स्पर्धा परीक्षेच्या धर्तीवर होणार असल्याचे सांगितले जात आहे . तर संचालक अथवा बँक प्रशासनाकडून भरतीत हस्तक्षेप होणार नसल्याचा दावा केला जात असला तरी भरतीसाठीची दिलेल्या लेखी परीक्षांची निवड यादी ही कागदपत्रांसह संचालक मंडळाने नेमलेल्या समितीच्या मर्जीनुसार दिसणार हे निश्चित आहे . तसे भरतीच्या नियमावलीत स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र जिल्हा बँके कडून नियम ढाब्यावर ठेवून अतर्गत भरती करण्याचे धोरण दिसत आहे .

ही भरती केवळ देखावा असून सर्व नियम ढाब्यांवर बसवले गेल्याचे आता पर्यंतचे चित्र आहे . आरक्षण बाबतचे एक मात्र घेणे देणे नाही या बँकेत ओबीसी , आदीवाशी , दलित या समाज्यातील लोकांना खऱ्या अर्थाने संधी मिळत नसल्याचे चित्र आहे . नोकरी भरती ही केवळ संचालक मंडळाच्या मर्जीनुसारचं होते . तेव्हा जिल्हा बँकेची नोकर भरती ही स्वच्छ व पारदर्शकचं व्हावी . या भरतीतून ओबीसी , आदीवाशी , दलित , सर्व सामान्य व गोर गरिबांना संधी मिळावी असे आवाहन करत वाकचौरे म्हणाले की , या भरतीत पारदर्श पणा न दिसल्यास संपूर्ण जिल्हयात रिपब्लिकन पक्षाच्यावतीने आंदोलन केली जाईल व याबाबत न्यायालयाचे दरवाजे ठोठावू असा इशारा विजयराव वाकचौरे यांनी दिला .
