{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":["local"],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{"addons":1},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":true,"containsFTESticker":false}

कर्नाटकात गणपतीच्या आरतीवर बंदी घालून काॅग्रेसने संस्कृती दाखून दिली-ना.विखे पाटील

 

 

 

 

शहरात अनेक गणेश मंडळाना भेटी,लाडक्या बहीणीशी साधला संवाद

 

 

संगमनेर l झुंजार न्यूज

 

 

 

काॅग्रेसची सता असलेल्या कर्नाटक राज्यात गणपतीच्या आरतीवर बंदी घालण्याच्या निर्णयातून काॅग्रेस पक्षाची संस्कृती समोर आली असून, आरत्या करत फिरणार्या काॅग्रेस नेत्यांनी याचा खुलासा केला पाहीजे, अन्यथा गणपती सुध्दा तुम्हाला माफ करणार नाही आशी खोचक टिका महसूल तथा पालक मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली.

 

 

संगमनेरचे कुलदैवत समनापूर येथील महागणपतीची आरती करून मंत्री विखे पाटील यांनी शहरातील विविध गणेश मंडळाना भेटी दिल्या.यानिमिताने शहरातील मंडळाच्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांची अतिषबाजी करून मंत्री विखे पाटील यांचे जोरदार स्वागत केले. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या यशस्वीतेमुळे शहरात ठिकठिकाणी लाडक्या बहीणीनी मंत्री विखे पाटील यांच्याशी संवाद साधून सेल्फी घेण्याचा आनंद लुटला.

 

 

माध्यमाशी बोलताना मंत्री विखे पाटील म्हणाले की,काॅग्रेसने देशाच्या संस्कृती परंपरेला केव्हाच बाजूला केले आहे.त्यामुळे त्यांचे नेतेच परदेशात जावून वाचाळपणा करीत असून,आरक्षणाच्या विरोधात त्यांनी केलेले वक्तव्य असो की आता कर्नाटक राज्यात गणपतीची आरती करण्यावर बंदी घालण्याचा निर्णयामुळे काॅग्रेस खरे स्वरुप लोकांसमोर आले असल्याचे विखे पाटील म्हणाले.

 

 

आगामी विधानसभा निवडणुकीत राज्यात पुन्हा महायुतीचेच सरकार सतेवर येणार असल्याचे ठामपणे सांगून खोटा नॅरेटिव्ह पसरवून काॅग्रेस आणि महाविकास आघाडीचे नेते काही स्वप्न पाहात असतील तर त्यांच्या भ्रमाचा भोळा फुटल्याशिवाय राहाणार नाही.काॅगेस नेत्यांनी कितीही राज्यात तळ ठोकू द्या राज्यातील जनता सूज्ञ आहे.जनता यांना पिटाळून लावल्याशिवाय राहाणार नाही असे स्पष्ट करून राज्यात कोणतेही नकारात्मक वातावरण नाही.महायुती सरकारने योजनांवर अतिशय चांगले काम सुरू केले असल्याने जनता महायुती सरकारच्या पाठीशीच उभी राहील असा विश्वास मंत्री विखे पाटील यांनी व्यक्त केला.

 

 

केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी घेतलेले निर्णय अतिशय क्रांतीकारी असून,निर्यात शुल्क माफ झाल्याने शेतकऱ्यांना जादा भाव मिळेल त्यांची उत्पादकता वाढेल याकडे लक्ष वेधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने सर्वच शेती उत्पादीत मालाचे हमीभाव वाढवले आहेत.त्याची तरदूत अर्थसंकल्पात केल्याने शेतकऱ्यांना अर्थिक स्थैर्य देण्यास केंद्र आणि राज्य सरकार कटिबध्द आहे.पण उठसूठ सरकारच्या शेतकरी हिताच्या निर्णयावर टिका करणारे शरद पवार दहा वर्ष केंद्रात कृषी मंत्री होते त्यांनी किती उत्पादनांना हमी भाव दिला असा प्रश्न करून शेतकऱ्यांच्या प्रश्नाचे केवळ राजकारण करण्याचा धंदा केला असल्याची टिका मंत्री विखे पाटील यांनी केली.

 

हैद्रबाद गॅझेटच्या प्रश्नावर बोलताना मंत्री विखे पाटील म्हणाले की,आरक्षणाच्या संदर्भात सर्व सोपस्कार पूर्ण करण्यासाठी राज्य सरकारने टिम पाठवली होती.त्यानंतरच महायुती सरकारने दाखले देण्याचे मोठे काम केले.सरकारने शेतकऱ्यांच्या जमीनी बाबतचा निर्णय केला आहे.आरक्षणाच्या बाबतीत सर्व बाजू तपासल्या जात आहेत.यासाठी अधिवेशन बोलाविण्याची मागणी होत आहे.मुख्यमंत्री योग्य तो निर्णय घेतील असे विखे पाटील यांनी या प्रश्नावरील उतरात सांगितले.

 

 

 

गणेश मंडळांना भेट देत असतानाच मंत्री विखे पाटील यांनी शहरातील सुप्रसिध्द गोंगे लस्सी सेंटरला भेट दिली.तीन पिढ्यापासून सुरू असलेल्या या व्यवसायाने लस्सीची टेस्ट कायम ठेवली असल्याचे कौतुक केले.

 

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *