{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":["local"],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{"addons":1},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":true,"containsFTESticker":false}

संगमनेर l झुंजार न्यूज

 

काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी, व्यापारी व सर्वसामान्य नागरिकांसाठी आर्थिक कामधेनू असलेल्या अमृतवाहिनी बँकेने गुणवत्तापूर्ण कामातून लौकिक मिळवला असून नागरी सहकारी बँक असोसिएशन कडून सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात अमृतवाहिनी सहकारी बँकेला दोन पुरस्कार देऊन गौरविण्यात आले असल्याची माहिती चेअरमन सुधाकर जोशी यांनी दिली आहे.

 

 

शिर्डी येथे झालेल्या अहमदनगर जिल्हा नागरी बँक असोसिएशनच्या कार्यक्रमात अमृतवाहिनी बँकेला एनपीए कमी केल्याबद्दल व स्टाफच्या ट्रेनिंग बद्दल पुरस्कार देण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष सत्यजित मुंदडा, उपाध्यक्ष व्यवहारे, प्रतीथयश उद्योजक राजेश मालपाणी यांच्या हस्ते चेअरमन सुधाकर जोशी, व्हा. चेअरमन ॲड.नानासाहेब शिंदे, संचालक किसन सुपेकर, अण्णासाहेब शिंदे, किसन वाळके ,शांताराम फड आदींसह विविध मान्यवरांनी हा पुरस्कार स्वीकारला.

 

 

सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या आदर्श शिस्तीवर बँकेची वाटचाल सुरू असून बँकेने आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली अत्याधुनिक प्रणालीचा वापर करून संपूर्ण कामकाज संगणकरीकरण केले आहे. याचबरोबर सातत्याने ऑडिटचा अ दर्जा राखताना नव्याने आश्वी साकुर घारगाव संगमनेर शहरातील मेन रोड येथे नवीन शाखा सुरू केले आहेत.

 

बदलत्या काळाबरोबर स्टाफला अत्याधुनिक ट्रेनिंग देऊन प्रशिक्षित केले आहे याचबरोबर ठेवीदार सभासद यांचा विश्वास सांभाळताना एनपीए कमी केला आहे त्यामुळे या दोन्हीही कामकाजाबद्दल जिल्हा नागरी बँक असोसिएशनच्या वतीने बँकेला दोन पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

 

यावेळी सुधाकर जोशी म्हणाले की, आमदार थोरात यांच्या नेतृत्वाखाली बँकेचे सर्व संचालक मंडळ व अधिकारी कर्मचारी एकजुटीने काम करत आहेत. सर्वसामान्यांच्या जीवनात आनंद निर्माण करणे यासाठी सकारात्मक भावनेतून बँक काम करत असल्याने हा पुरस्कार मिळाल्या असून हा पुरस्कार सर्वांच्या एकत्रित कामाचा असल्याचे ते म्हणाले.

 

 

बँकेला हे पुरस्कार मिळाल्याबद्दल राज्याचे नेते आमदार बाळासाहेब थोरात, मा. आमदार डॉ सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे , ॲड.माधवराव कानवडे, डॉ जयश्रीताई थोरात, बाबासाहेब ओहोळ, रणजितसिंह देशमुख, इंद्रजीत भाऊ थोरात,संपतराव डोंगरे, शंकरराव खेमनर, रामहरी कातोरे, हौशीराम सोनवणे, लक्ष्मणराव कुटे आदींसह विविध मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.

 

 

ॲड.नानासाहेब शिंदे यांची जिल्हा असोसिएशनच्या संचालक पदी निवड

 

 

अमृतवाहिनी सहकारी बँकेचे विद्यमान व्हाईस चेअरमन ॲड नानासाहेब शिंदे यांची अहमदनगर जिल्हा नागरी बँक असोसिएशनच्या संचालक पदी निवड झाली आहे. नानासाहेब शिंदे यांनी य सहकाराबरोबरच बँकिंग क्षेत्रात सातत्याने काम केले असून त्यांच्या कामाची दखल घेत त्यांची जिल्हा कार्यकारणीवर निवड झाल्याने त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

 

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed