{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":["local"],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{"addons":1},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":true,"containsFTESticker":false}

 

प्रवरेतील नवरात्र उत्सवास प्रारंभ

 

 

आश्वी | झुंजार न्यूज

 

 

नवरात्र उत्सव श्रद्धा, संस्कृती आणि शक्तीचा जागर करण्याचा आहे. या माध्यमातून महिलांनी आपली संस्कृती परंपरा समजून घेत नऊ दिवसांचा आनंदोत्सव साजरा करावा असे प्रतिपादन स्पेशल ऑलिंपिक भारत, अहिल्यानगर विभागाच्या अध्यक्षा सौ.धनश्रीताई विखे पाटील यांनी केले.

 

 

 

महसुल तथा पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संकल्पनेतून आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुस्मिता विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाने लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या वतीने प्रवरा शैक्षणिक संकुलामध्ये सहकारातून समृद्धीकडे संकल्पनेतून प्रवरा शारदीय नवरात्र उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.आश्वी खुर्द येथील कला, विज्ञान, वाणिज्य आणि संगणक महाविद्यालय या ठिकाणी प्रवरा शारदीय नवरात्र उत्सवाचा प्रारंभ सौ.धनश्रीताई विखे पाटील,यांच्या उपस्थितीत करण्यात आला.

 

 

याप्रसंगी भाजपाच्या जिल्हा महिला अध्यक्षा सौ. कांचनताई मांढरे, संस्थेच्या संचालिका अॅड सौ. रोहीणीताई निघुते,सौ अलकाताई दिघे,सरपंच सौ.अलकाताई बापुसाहेब गायकवाड, कॅम्पस संचालक डॉ. महेश खर्डे ,प्राचार्य डाॅ.देवीदास दाभाडे ,क्रिडा संचालक डाॅ.प्रमोद विखे आदी उपस्थित होते.

 

 

 

यावेळी बोलताना सौ धनश्रीताई विखे पाटील म्हणाल्या प्रवरेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना व्यासपीठ दिले जाते या व्यासपीठाच्या माध्यमातून एक आदर्श विद्यार्थी घडवण्याचं काम संस्थेच्या माध्यमातून होत आहे. सणवार उत्सव ही भारतीय संस्कृतीमध्ये अतिशय महत्त्वाचे आहेत. आपल्या उत्सव आणि परंपरांची माहिती शालेय पातळीवर मिळण्याच्या दृष्टीने शारदोत्सव उपक्रम महत्त्वपूर्ण ठरत आहे. महिलांसाठी केवळ नऊ दिवस हा उत्सव न राहता सर्वच दिवस आपले आहेत. महिलांनी आपल्या कुटुंबाची जबाबदारी पार पाडताना स्वतःसाठी ही वेळ द्यावा. आयुष्यात स्वप्न बघा ती पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी केले.

 

 

 

प्रारंभी डॉ. सुर्वणा घोलप यांनी प्रास्ताविकामध्ये प्रवरा नवरात्र उत्सवाची पार्श्वभूमी सांगतानाच या माध्यमातून संपन्न होणाऱ्या विविध कार्यक्रमांमध्ये सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन केले. महाविद्यातील मुलींनी नव दुर्गाची भुमिका साकार करत आपली ओळख करुन देत कार्याची माहीती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सुवर्णा जाधव यांनी तर आभार सोनाली पारधे यांनी मानले.

 

प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या माध्यमातून वेगवेगळे उपक्रम हे सुरू असतात याच माध्यमातून प्रवरा नवरात्र उत्सव हा आगळावेगळा पद्धतीने शिर्डी मतदारसंघातील विविध शाळा महाविद्यालयांमध्ये संपन्न होत आहे. नवरात्र निमित्त देवीच्या जागरा बरोबरच एक झाड आईसाठी ही संकल्पना राबवत या निमित्ताने महाविद्यालयाच्या प्रांगणात वृक्षारोपणही मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले

 

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *