पाथरे | झुंजार न्यूज
राहाता तालुक्यातील पाथरे बु॥ येथील लोकनेते डॉ बाळासाहेब विखे पाटील (पद्मभूषण उपाधीने सन्मानित) प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे श्री छत्रपती शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय संस्थेच्या कार्यकारी अधिकारी मा. डॉ. सुष्मिताताई विखे पाटील यांच्या संकल्पनेतून सन २०२४-२५ या वर्षीचा इयत्ता ११ वी व १२ वी च्या विद्यार्थ्यांचा माता पालक मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. श्री उमेश गिताराम पा घोलप हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. डॉ. सोमनाथ घोलप उपस्थित होते .

प्राचार्य डॉ. सोमनाथ घोलप सर म्हणाले की , भारतीय शिक्षण पद्धती ही इतर देशाच्या शिक्षण पद्धतीपेक्षा वेगळी असून या शिक्षण पद्धती मधून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकासाबरोबरच राष्ट्राच्या विकासासाठी पूरक आहे. भारतीय शिक्षण पद्धती ही विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या कला गुणांना वाव देणारी शिक्षण पद्धती आहे. विद्यार्थ्यांनी पाचात्य संस्कृतीला झिडकारून भारतीय संस्कृतीतील चांगल्या गोष्टी अंगीकारल्या पाहिजे. विद्यार्थ्यांमध्ये घडणारे शारीरिक बदल, मानसिकतेत होणारे बदल, भावनिक बदल, निरोगी आरोग्यासाठी घ्यावयाची काळजी, सोशल मीडिया व त्याचे विद्यार्थ्यांच्या जीवनावर होणारे परिणाम याविषयी सखोल अशी मार्गदर्शन करत त्यावरील उपाय यावर ही विस्तृत मार्गदर्शन त्यांनी उपस्थित माता पालक व विद्यार्थ्यांना केले.

कार्यक्रमात महाविद्यालयाच्या ज्येष्ठ प्रा. नूतन जोंधळे मॅडम यांनी शिक्षणाबरोबरच विद्यार्थी चारित्र्यसंपन्न बनले पाहिजे संस्कार अंगी बाळगून समाजात प्रतिष्ठा वाढविण्याचा प्रयत्न केला पाहिजे. असे सांगितले.

मा. प्राचार्य के. बी. बारगुजे सर यांनी महाविद्यालयात राबवल्या जात असणाऱ्या विविध शैक्षणिक कार्यक्रमांची माहिती यावेळी आपल्या मार्गदर्शनातून दिली.

यावेळी पालक प्रतिनिधी म्हणून श्री गागरे, सौ आशाताई ब्राह्मणे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून कु. सई कडू हिने आपली मनोगत व्यक्त केली. या कार्यक्रमासाठी संरपच मा. उमेश गिताराम पा घोलप , मा. सोपान लक्ष्मण पा. घोलप , मा. सिराजभाई शेख , मा. वसीम भाई शेख , मा. हिरामण चंद्रभान पा. कदम , मा. धोंडीराम जिजाबा पा कडू , मा. मोहम्मदभाई शेख , मा. साहेबराव पा घोलप , मा. राजेंद्र वामन पा. कदम , मा. सर्जेराव दौलत पा. कदम आदींसह मोठ्या संख्येने माता पालक उपस्थित होते.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य मा. बारगुजे सर उपप्राचार्य मा. वाणी मॅडम कनिष्ठ महाविद्यालयाचे समन्वयक डॉ. संदीप म्हस्के यांसह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले .

