{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":["local"],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{"addons":1},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":true,"containsFTESticker":false}

 

लासलगाव | झुंजार न्यूज

 

 

 

शेतजमिन गट नं.2 मध्ये आरोपी-गणेश जयराम जगताप, रा. धारणगाव खडक, ता. निफाड याने आम्ही खरेदी केलेल्या शेत जमिनीत बेकायदेशीर कब्जा करुन तुम्ही येथे का आले या कारणावरुन जातीवाचक शिवीगाळ करुन जिवे ठार मारण्याची धमकी दिली. म्हणून गणेश जयराम जगताप, रा. धारणगाव खडक, ता. निफाड जि. नाशिक याचेविरुध्द ॲट्रॉसिटी दाखल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.

 

 

 

 

 

सविस्तर वृत्त असे की उषा उर्फ सुमन रंगनाथ मोरे, वय 63 वर्ष, फिर्याद लिहून दिली की, मी वरिल ठिकाणी पती रंगनाथ मोरे , अमोल व आशिष, मोरे -प्रियंका, मोरे नात-शौर्या असे एकत्रित कुटुंबिय राहतो. माझे पती इंजिनिअर असुन ते साउथ आफ्रिकेमध्ये जॉब करतात. सध्या ते सुट्टीवर आलेले आहेत. गेले सहा महिन्यापुर्वी माझे पतीने धारणगाव खडक, ता. निफाड येथील शेत जमीन गट नं.2 एकूण शेतजमिन दि.28/09/2024 रोजी मी व माझे पती रंगनाथ, मोरे ,अलका राजेन्द्र आहिरे, संजय मारुती सोनवणे रा. धारणगाव वीर ता. निफाड असे आमची वरील खरेदी केलेली जमीन पाहण्यासाठी गेलो असता दुपारी 03/00वा. चे सुमारास आमच्या वरील शेतजमीनीत 03 ते 04 अनोळखी इसम प्लॅस्टीक कागदाचे शेड बनवुन त्या ठिकाणी बसलेले होते. तेव्हा मी त्यांना विचारले कि, तुम्ही हे शेड येथे का टाकले, ही जमीन आमची आहे, कोणाला विचारून टाकले. तेव्हा त्यापैकी एक उंच असलेला व शरिराने धष्ट पुष्ट असणारा इसम आम्हाला म्हणाला की, ही जमीन तुमची कशावरुन आहे. तेव्हा मी त्यांना सदर जमीनीचा उतारा दाखवला असता त्यांनी माझे जमिनीचा उतारा बघितला. त्यावरील माझे मुलाचे नाव-अमोल रंगनाथ मोरे, आशिष रंगनाथ मोरे असे नावे बघून तुमची जात काय आहे असे विचारले. तेव्हा मी त्यांना माझा धर्म बौध्द असल्याचे सांगितले. तेव्हा तो म्हणाले की, महार जातीचे लोकांना व मुस्लिमांना येथे जमीनी घेण्याची परवानगी नाही. आमचे देवीचा अपमान होतो. त्यावर आम्ही त्यांना समजावून सांगितले की, सदरची जमीन ही आम्ही कायदेशीररित्या खरेदी केलेली आहे. त्यावर तेथील अनोळखी इसमांपैकी एक इसमाने आम्हाला महारांनो तुम्ही येथुन निघुन जा नाही तर, तुम्हाला गोळ्या घालुन मारुन टाकीन असे बोलून तुम्ही पुन्हा येथे आले तर तुमच्याकडे पाहुन घेवु व एक एकाला जिवे मारून टाकु अशी जिवे ठार मारण्याची धमकी दिली. तेव्हा मी तसेच माझे पती रंगनाथ अर्जुन मोरे, अलका राजेन्द्र आहिरे रा. नाशिक, संजय मारुती सोनवणे, रा. धारणगाव वीर ता. निफाड असे खुप घाबरुन गेलो. तेव्हा संजय मारुती सोनवणे यांनी मला जातीवाचक बोलून जिवे ठार मारण्याची धमकी देणाऱ्या इसमाचे नाव गणेश जयराम जगताप, रा. धारणगाव खडक, ता. निफाड, जि. नाशिक असे असल्याचे सांगितले. त्यावेळी आम्ही घाबरल्याने सर्वजण तेथुन नाशिक येथील आमचे घरी निघून गेलो. आज रोजी मी घरातील लोकांशी चर्चा करून उशिराने पोलीस ठाणेस तक्रार देण्यासाठी आली असून दिं. 28/09/2024 रोजी दुपारी 03/00 वा. चे सुमारास धारणगाव खडक ता. निफाड येथील आम्ही खरेदी केलेल्या शेतजमिन गट नं.2 मध्ये आरोपी -गणेश जयराम जगताप, रा. धारणगाव खडक, ता. निफाड याने आम्ही खरेदी केलेल्या शेत जमिनीत बेकायदेशीर कब्जा करुन तुम्ही येथे का आले या कारणावरुन जातीवाचक शिवीगाळ करुन जिवे ठार मारण्याची धमकी दिली.

 

 

 

 

या अनुषंगाने गुन्हा रजि.क्र ०२३२/०२४ प्रमाणे अनुसूचीत जाती आणि अनुसूचीत जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम, १९८९ ,3(1)(R) अनुसूचीत जाती आणि अनुसूचीत जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम, १९८९ ,३,(१) (s) अनुसूचीत जाती आणि अनुसूचीत जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम, १९८९ 3(1) (F) अनुसूचीत जाती आणि अनुसूचीत जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम, १९८९ 3(1)(G)प्रमाणे दाखल केले असून पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने,ग्रामीण विभाग,नासिक, यांच्या नेतृत्वाखाली,पोलीस उपविभागीय अधिकारी निलेश पालवे तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्कर शिंदे लासलगाव हे पुढील तपास करीत आहेत

 

 

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed