मुंबई। झुंजार न्यूज
मुंबई जिल्हाधिकारी कार्यालयातून ऑनलाईन पद्धतीने राज्यातील सुशोभीकरण केलेल्या ५० दुय्यम निबंधक कार्यालयांचे उद्घाटन तथा महसूल पंधरवडा ई-बुक प्रकाशन सोहळा संपन्न झाला.
यावेळी महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव श्री. राजेशकुमार, नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक श्री. हिरालाल सोनवणे, अपर मुद्रांक नियंत्रक मुंबईचे श्री. संजय सिंह चव्हाण, मुंबई नगर जिल्हाधिकारी श्री. संजय यादव, मुद्रांक व नोंदणी शुल्क विभागाचे उपसचिव श्री. सत्यनारायण बजाज, नोंदणी उपमहानिरीक्षक मुख्यालय पुणे श्री. उदयराज चव्हाण, मुंबई विभागाचे नोंदणी उपमहानिरीक्षक श्री. राजू थोटे आदींची उपस्थिती होती.
तसेच ऑनलाईन प्रणालीच्या माध्यमातून ग्रामविकास मंत्री श्री. गिरीश महाजन, राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री श्री. गुलाबराव पाटील, आमदार श्री. भरत गोगावले, आमदार श्रीमती मोनिका राजळे, आमदार सौ. देवयानी फरांदे, आमदार श्री. मोहन मने, आमदार श्री. शिवाजीराव कर्डिले, आमदार श्री. आशुतोष काळे, आमदार श्री. महेंद्र दळवी, आमदार श्री. संजय केळकर, आमदार श्री. राजुमामा भोळे, आमदार श्री. किशोर पाटील, आमदार श्रीमती मंजुळा गावीत, आमदार श्री. विजयकुमार गावीत तसेच राज्यातील मुद्रांक व नोंदणी विभाग तसेच महसूल विभागातील प्रमुख अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

