महायुती पटापट देते खटाखट देणारे पळून गेले
संगमनेर तालुक्यातील ५४ कोटींच्या विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण
संगमनेर | झुंजार न्यूज
लोकसभा निवडणुकीत खटाखट पैसे देणार्या काॅग्रेस नेत्यांना हरीयाणातील बहीणीनी घरचा रस्ता दाखवला.राज्यातही योजना बंद करण्याची भाषा करणार्यांना दारा उभे करू नका.महायुती सरकार लाडक्या भाऊ बहीणींच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून सर्व योजनांच्या लाभार्थीना पटापट पैसे देण्याचे काम होत असल्याचे प्रतिपादन महसूल तथा पालक मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.

संगमनेर तालुक्यात महायुती सरकारने मंजूर केलेल्या सुमारे ५४कोटी रूपयांच्या कामांचे लोकार्पण आणि भूमीपूजन तसेच नारीशक्ती सन्मान सोहळ्याप्रसंगी मंत्री विखे पाटील बोलत होते.भाजपाचे शहर अध्यक्ष श्रीराम गणपुले तालूका अध्यक्ष वैभव लांडगे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आबासाहेब पवार शिवसेनेचे रामभाऊ राहाणे संजय गांधी योजनेचे अध्यक्ष अमोल खताळ लाडकी बहीण योजनेचे शरद गोर्डे डाॅ अशोक इथापे तहसीलदार धीरज मांजरे, उपविभागीय पोलीस अधिकारी कुणाल सोनवणे, गटविकास अधिकारी अनिल नागणे, उपविभागीय कृषी अधिकारी भाऊसाहेब गायकवाड, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता श्रीनिवास वर्पे, कृषी अधिकारी गायकवाड आदी उपस्थित होते.

पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणाकडे पाऊल टाकले आहे. या योजनेतील लाभापासून वंचित महिलांना सप्टेंबर, ऑक्टोंबर व नोव्हेंबर या तीन महिन्यांचे पैसे येत्या काही दिवसांत महिलांच्या खात्यात जमा होणार आहेत. या योजनेत संगमनेर तालुक्यात १०१ कोटी रूपयांचा लामांचे वितरण करण्यात आले आहे. पीक विमा, दूध अनुदान योजनेचे पैसेही शेतकऱ्यांच्या खात्यात वितरित करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यात महाविकास आघाडी सरकार अडीच वर्ष सतेवर होते.

कोणताही निर्णय राज्याच्या हिताचा त्यांनी घेतला नाही.महायुती सरकारमुळे प्रत्येक समाज घटकाला न्याय देण्याचा प्रयत्न झाला असून,कोणतीही योजना बंद होणार नाही उलट लाडकी बहीण योजनेचे पैसे वाढवून देणार असल्याची ग्वाही मंत्री विखे पाटील यांनी दिली.

लोकसभा निवडणुकीत खोटा प्रचार करून जनतेला खटाखट पैसे देणारे केव्हाच पळून गेले.महायुती सरकार पटापट पैसे देण्याची भूमिका घेत असून पटापट पैसे देणार्या महायुती सरकारच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचे आवाहन मंत्री विखे पाटील यांनी केले.
शासनाने अंगणवाडी सेविका, आशा वर्कर यांचे मानधन वाढविण्यात आले असून . महिलांना एसटी भाड्यात पन्नास टक्के सवलत दिल्याने तोट्यातील एसटी फायद्यात आली आहे. मुख्यमंत्री तीर्थ दर्शन भेट योजनेतून येत्या काळात जिल्ह्यातील ८०० ज्येष्ठ नागरिकांना अयोध्या यात्रा घडवून आणली जाणार आहे. मुख्यमंत्री बळीराजा योजनेत शेतकऱ्यांच्या कृषी पंपाचे वीज बील माफ करण्यात आल्याने शून्य रकमेचे बील दिले आहे.

यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते जनजीवन जीवन मिशनच्या १५ कोटींच्या कामांचे लोकार्पण करण्यात आले. काही महिला बचतगटांना प्रातिनिधिक स्वरूपात फुड प्रोसेसिंग युनिटचे वाटप करण्यात आले. बांधकाम कामगार आवश्यक साधने व उपकरणे वाटप या योजनेतील ४०० लाभार्थांपैकी एका कामगारांला प्रातिनिधिक स्वरूपात साहित्याचे वाटप करण्यात आले. गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना, प्रधानमंत्री आवास योजना, प्रधानमंत्री पीक विमा योजना या योजनेतील लाभार्थ्यांना लाभाचे प्रातिनिधिक स्वरूपात वितरण करण्यात आले. महिला बचतगटांना प्रातिनिधिक स्वरूपात बॅंक कर्जाचे वाटप करण्यात आले.
शहरातील गंगामाई घाट परीसरात दशक्रीया विधी घाटाचे भूमीपूजन मंत्री विखे पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आले.सुमारे ४० लाख रुपयांचा निधी यासाठी ना.विखे यांनी मंजूर केला आहे.राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते अशोकराव सराफ प्रा.एस.झेड.देशमुख सुभाष कोथमिरे शिरीष मुळे पुरोहीत संघाचे भाऊ जाखडी आदी याप्रसंगी उपस्थित होते.

याप्रसंगी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी पल्लवी रूपवते, कल्पना भालेराव अंगणवाडी सेविका संघटनेच्या अध्यक्षा सौ.वाकचौरे यांनी मनोगत व्यक्त केले.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे संगमनेर तालुक्यात १ लाख ३५ हजारपेक्षा जास्त लाभार्थी असल्याची माहिती प्रास्ताविकात तहसीलदार धीरज मांजरे यांनी दिली.

